
crime (फोटो सौजन्य: social media)
• चेतन चौधरीचे लोहगडावर सुमारे 2 तास 40 मिनिटे सीन रिक्रिएशन करण्यात आले.
• हत्येच्या दिवशीचा घटनाक्रम आणि सीसीटीव्हीतील संशयित व्यक्तीची पडताळणी करण्यात आली.
• याआधी सिया गोयलचेही लोहगडावर नेऊन रिक्रिएशन करण्यात आले होते.
पुणे: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिला लोहगड किल्ला परिसरात नेऊन गुन्ह्याचे ‘सीन रिक्रिएशन’ करण्यात आले. आता चेतन चौधरी सोबतदेखील ‘सीन रिक्रिएशन’ करण्यात आले. चेतनला लोहगडावर नेण्यात आले. यावेळी लोहगडावरील ज्या ठिकाणहून केतनला दरीत ढकलण्यात आलं. त्याचं जागेवरुन रिक्रिएशनवेळी चेतनने प्रियकराने केतनचा पुतळा लोहगडावरुन खाली ढकलला.
2 तास 40 मिनिटं गुन्ह्याचं रिक्रिएशन
चेतन चौधरीला हत्येच्या दिवशी ज्या विषभूशेत आला होता, त्याच विषभूशेत लोहगडावर आणण्यात आलं होतं. केतनच्या हत्येच्या दिवशी सीसीटीव्हीत दिसलेला चेतनचं होता याची पोलिसांनी पडताळणी केली. रिक्रिएशनवेळी सियाच्या प्रियकराने केतनचा पुतळा लोहगडावरुन खाली ढकलला. केतनच्या हत्येच्या दिवशी नेमकं कशा पद्धतीने त्याला लोहगडावरून ढकलण्यात आलं, याची माहिती पोलिसांनी घेतली. साधारण 2 तास 40 मिनिटं गुन्ह्याचं रिक्रिएशन सुरु होतं. आधी सियाच सिन रेक्रीशन करण्यात आला आता चेतन चौधरींचं करण्यात आलं.
केतन-सियाच्या कुटुंबाचा आनंदी डान्स व्हिडिओ व्हायरल; हत्याकांडानंतर जुन्या आठवणींनी डोळे पाणावले
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. डिजिटल तपास, सोशल मीडिया आणि पोलिसांच्या चौकशीतून या प्रकरणातील अनेक कड्या जोडल्या जात आहेत. दरम्यान, आता या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो केतन आणि सिया गोयल यांच्या कुटुंबाच्या एका आनंदी कौटुंबिक कार्यक्रमातील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमुळे हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
स्वतः अग्रवाल फॅमिलीने शेअर केल्याचा दावा
हा व्हिडिओ गेल्या ७ मे रोजी झालेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात केतन अग्रवाल, त्याचे वडील आणि आरोपी सिया गोयल हिचे आई-वडील व इतर नातेवाईक एकत्र सहभागी झाले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन्ही कुटुंबातील सदस्य गाण्यांवर एकत्र डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये केतन अग्रवाल अत्यंत बेभान होऊन नाचताना दिसत असून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. केतनचा हा आनंदी चेहरा पाहून आता पाहणाऱ्यांचे डोळे पाणावत आहेत. हा व्हिडिओ स्वतः अग्रवाल फॅमिलीने शेअर केल्याचा दावा सध्या केला जात आहे.
Ahilyanagar Crime: आलिशान कार, पांढरी पोती अन् 28 लाखांचा गुटखा; नगरमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई
Ans: आरोपी चेतन चौधरीला लोहगडावर नेऊन गुन्ह्याचे रिक्रिएशन करण्यात आले.
Ans: केतनला दरीत कशा पद्धतीने ढकलण्यात आले आणि घटनाक्रम कसा घडला याची पडताळणी करण्यात आली.
Ans: लोहगडावर चेतन चौधरीचे रिक्रिएशन सुमारे 2 तास 40 मिनिटे चालले.