Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatarpati Sambhaji nagar Crime News दलित अत्याचारासह गुन्हेगारीचा वाढता आलेख; संभाजीनगर गुन्हेगारांचा नवा अड्डा

Chhatarpati Sambhaji nagar Crime शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल २८ खूनाच्या घटना समोर आल्या आहेत, गतवर्षीच्या तुलनेत ही सख्या १५ ने घटली असून त्यात सर्व २८ गुन्ह्यातील आरोपी उघड झाले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 31, 2025 | 09:53 AM
Sambhajinagar: Increase in incidents of atrocities against women, atrocities against Dalits, two-wheeler thefts, and murders.

Sambhajinagar: Increase in incidents of atrocities against women, atrocities against Dalits, two-wheeler thefts, and murders.

Follow Us
Close
Follow Us:
  • शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिस अपयशी
  • खुनाच्या प्रयत्नात झपाट्याने वाढ
  • महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ
  • २८ खुनाच्या घटना उघडकीस
  • दलित अत्याचाराचे गुन्ह्यात वाढ
Chhatarpati Sambhaji nagar Crime News: शहरातील वाढते गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यात पोलिसांना अपयश आले असून खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बलात्कार, विनयभंगाच्या घटनेत झपाट्‌याने वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात दलित अत्याचारांमध्ये वाढ झाल्याने वर्षभरात तब्बल १०३ अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून ही बाब चिंताजनक आहे. मात्र, खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आल्याने पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गेल्या वर्षभरातील गुन्हेगारी घटनांचा वार्षिक घटनांची माहिती पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी मंगळवारी आयुक्तालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रत्नकार नवले, सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर आदींची उपस्थिती होती.

खुनाच्या प्रयत्नात झपाट्याने वाढ
प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या घटना झापाट्याने वाढल्या आहेत. गतवर्षी शहरात एकूण ११७ जणांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता, यावर्षीं तब्बल २५ गुन्हे वाढले असून हा आकडा १३४ वर पोहचला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस खुनी हल्ला करणार्या गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येते.

२८ खुनाच्या घटना उघडकीस
शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल २८ खूनाच्या घटना समोर आल्या आहेत, गतवर्षीच्या तुलनेत ही सख्या १५ ने घटली असून त्यात सर्व २८ गुन्ह्यातील आरोपी उघड झाले आहेत.

महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून बलात्कार सह विनभंगाचे गुन्हे वाढले आहेत. गेल्या नऊ महिन्यात बलात्काराचे १५५ गुन्हे दाखल झाले असून गतवर्षपिक्षा ६ ने गुन्हे वाढले आहेत. तर विनयभंगाचे ३९९ गुन्हे दाखल असून त्यात गतवर्षाच्या तुलनेत १० ने गुन्हे वाढले आहेत.

दुचाकी चोरीची संख्या १ हजार ३४ वर
शहरात दुचाकी चोरट्यानी उच्छांक माडला असून गतवर्षीपेक्षा १७३ वाढून हा आकडा १ हजार ३४ वर पोहचला आहे. यापैकी २२० घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच शहरातील १९२ ठिकाणी जबरी चोऱ्या घडल्या आहेत. त्यापैकी १४७ गुन्हे उघडकीस आले आहेत. गत वर्षाच्या तुलनेत जबरी चोरीच्या घटना १७ ने वाढली आहेत.

नायलॉन मांजा : २३ दिवसात १३, गुन्हे, २९ अटक
प्रतिबंधित नायलॉन मांजाचे डिसेंबरमधील २३ दिवसात १३ गुन्हे दाखल करून २३ लाख १५ हजार ५५० रुपये किमतीच्या १ हजार ६८३ भिंगरी-चक्री जप्त करण्यात आले. यातील २९ आरोपींना अटक केल्याची माहितीही त्यांनी दिली.

दलित अत्याचाराचे गुन्ह्यात वाढ
पोलीस आयुक्तालयात गेल्या वर्षभरात दलित अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून तब्बल १०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ४५ ने वाढ झाली असून अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत हे गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. हे वाढते गुन्हे चिंतेची बाब बनली असून मागसवर्गियांमध्ये असुरक्षीतेची भावना निर्माण होत आहेत.

 

Web Title: Chhatarpati sambhaji nagar crime news crime news rising graph of crime including atrocities against dalits sambhaji nagar becoming a new hub for criminals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • crime news
  • crime news marathi
  • Maharashtra Police

संबंधित बातम्या

Mumbai Customs Action: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई! ४० कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज, सोने आणि परकीय चलन जप्त
1

Mumbai Customs Action: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई! ४० कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज, सोने आणि परकीय चलन जप्त

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या
2

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या

पोलिसच सुरक्षित नाहीत! हवालदाराच्याच खात्यातून काढले ८ लाख रूपये; कुठे घडली घटना?
3

पोलिसच सुरक्षित नाहीत! हवालदाराच्याच खात्यातून काढले ८ लाख रूपये; कुठे घडली घटना?

Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
4

Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.