Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमात ठार! महिलेवर अमानुष अत्याचार, जाळून टाकले अन् विवस्त्र अवस्थेत; संभाजीनगर नर्स हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपत संभाजीनगर शहरामधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सचा तिच्या प्रियकरानेच खून केल्याची घटना घडली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 18, 2025 | 12:48 PM
प्रेमात ठार! महिलेचे कपडे काढले, जाळून टाकले अन् विवस्त्र अवस्थेत..., संभाजीनगर नर्स हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

प्रेमात ठार! महिलेचे कपडे काढले, जाळून टाकले अन् विवस्त्र अवस्थेत..., संभाजीनगर नर्स हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

Follow Us
Close
Follow Us:

Chhatrapati Sambhajinagar Crime New Marathi: छत्रपती संभाजीनगर येथील नर्स मोनिकाच्या हत्या प्रकरणात आता नवीनतम माहिती समोर येत आहे. याप्रकरणी आरोपी इरफानने प्रेम प्रकरणातून मोनिकाची हत्या केल्याची माहिती यापूर्वीच समोर आली होती. मात्र आता पोलिसांच्या तपासात मोनिकाची हत्या कशी झाली याचा खुलासा करण्यात आला आहे. आरोपीने पीडितेला जादू दाखवण्याच्या बहाण्याने पीडितेचे हात बांधले, नंतर डोळे बंद करायला लावत ,तिची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मोनिका सुमित निर्मल असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. तर पशेख इरफान शेख पाशा असे हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली. मोनिका ही जालना येथे राहत होती. दररोज ती कामानिमित्त संभाजीनगरला ये-जा करत होती.तसेच ती रेल्वे स्टेशनवर दुचाकी लावायची.

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; व्यावसायिकाचे घर फोडून लाखोंचा ऐवज चोरला

नेमकं प्रकरण काय?

मूळची जालना येथील रहिवासी असलेली मोनिका छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती. तिचे लग्न झाले होते, मात्र तिचा नवऱ्यासोबत वाद सुरु होता. याच काळात तिची संभाजीनगरमधील एका पार्किंगमध्ये काम करण्याऱ्या इरफानसोबत ओळख झाली. त्यानंतर, मैत्रिचे रूपांतर प्रेमात सुरू झाले. दीड वर्षांपासून दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दोघंचं तासनतास फोनवर बोलणं व्हायचं. मात्र अलीकडच्या काही काळात दोघांच्या नात्यात दुरावा आला होता.

१८ जनावरीला हत्या

मोनिकाने इरफानचा फोन उचलणे बंद केले. १८ जानेवारीला इरफानने मोनिकाला अनेक वेळा फोन केले. मात्र तिने फोन न उचल्याने इरफानला राग आला होता. मोनिका आधीसारखी वागत नव्हती, या रागातून त्याने मोनिकाची हत्या करण्याचा कट रचला होता अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली.

जादू दाखवतो म्हणत डोळे बंद केले अन्…

६ फेब्रुवारी रोजी घटनेच्या दिवशी मोनिका छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरून तपोवन एक्सप्रेसने लासूर रेल्वे स्थानकावर आली. इरफानने इथे तिची वाट बघत होता. यावेळी तो दारूच्या नशेच होता.

मोनिका आल्यानंतर दोघेही दुचाकीने लासूर रेल्वे स्थानकाजवळील स्मशानभूमी परिसरातील एका पडक्या घराजवळ गेले. याठिकाणी काही वेळ दोघंही गप्पा मारत बसले. पण इरफानचा राग कमी झाला नव्हता. त्यामुळे त्याने जादू दाखवतो, असं सांगून मोनिकाचे हात बांधले. तसेच डोळे बंद करायला सांगितले. पुढच्या क्षणात आपल्यासोबत काय घडणार आहे? याची कसलीही कल्पना नसलेल्या मोनिकाने आरोपीवर विश्वास ठेवून डोळे बंद केले.

आरोपीने याचा फायदा घेतला आणि मोनिकाचा गळा आवळला.ही हत्या करण्यापूर्वी आरोपीने घटनास्थळी एक खड्डा खोदून ठेवला होता. पुरावे नष्ट करण्यासाठी, आरोपीने पीडितेचे कपडे काढले आणि जाळून टाकले आणि विवस्र अवस्थेत पुरलं. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेच्या अंगावरील दागिने काढून घेतले आणि ४८ हजार रुपयांना विकले. याबाबतचा खुलासा आरोपीनं दिला आहे. पोलीस घटनेची पुढील चौकशी करत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तावरील पोलिसालाच मारहाण, रिक्षाचालकाने संतप्त होऊन…

Web Title: Chhatrapati sambhaji nagar crime marathi nurse life ended by her boyfriend and the body was buried in an abandoned room in the farm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 12:47 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • crime
  • police

संबंधित बातम्या

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर
1

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
2

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
3

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

पावसात हेडफोन घालून जाणं एका १७ वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतलं; महावितरणाच्या हाय टेन्शन वायरने लागला शॉक,मुंबईतील घटना
4

पावसात हेडफोन घालून जाणं एका १७ वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतलं; महावितरणाच्या हाय टेन्शन वायरने लागला शॉक,मुंबईतील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.