
crime (फोटो सौजन्य: social media)
विद्यार्थीनी आठवी इयत्तेत शिकत होती. शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी घेऊन आत्महत्या केली. जालना जिल्ह्यातील मस्तगड या गावात तिचे घर आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्षकांवर आरोप केले आहेत. शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच आरोप पालकांनी केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
Pune Crime: पुण्यात हत्येचं सत्र सुरु! चुलत भावाकडून तरुणाची हत्या, मृतदेह पोत्यात भरला आणि…
जालन्यात क्रीडा प्रबोधिनीत शिक्षण घेण्याऱ्या 4 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग, क्रीडा शिक्षकाला अटक
जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रबोधिनीत क्रीडा शिक्षण घेणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचं समोर आलं आहे. विनयभंग केल्याचा आरोप क्रीडा शिक्षक तथा व्यवस्थापक प्रमोद खरात याच्यावर ठेवण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये पोलीस आणि शिक्षण विभागाने चौकशी केली या चौकशीनंतर अखेर प्रमोद खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय प्रकरण?
जालना शहरात क्रीडा प्रबोधिनी आहे. इथे ग्रामीण भागातून आलेल्या अल्पवयीन मुली क्रीडा शिक्षण घेतात. याच ठिकाणी प्रमोद खरात हा क्रीडा शिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. तो क्रीडा शिक्षणाच्या नावाखाली येथील अल्पवीन मुलींचे लैंगिक शोषण करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मिळाली होती.
या गोपनीय माहितीनंतर, शिक्षण विभागाने या प्रकरणाची शनिवारी चौकशी केली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी स्वतः पीडित मुलींची चौकशी केली. तेव्हा या सखोल चौकशीनंतर, गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रीडा शिक्षक आणि प्रबोधिनी व्यवस्थापक प्रमोद खरात याच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रमोद खरातला बेड्या ठोकल्या.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव या करत असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक करत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
Ans: 13
Ans: छत
Ans: शिक्षक