Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navin Chichkar : हायड्रो गांजाची तस्करी प्रकरण, नेपाळमार्गे परदेशात पळून जाणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी केली अटक

हायड्रो गांजाची तस्करी करणारा मुख्य आरोपी नवीन चिचकर, याच्या साखळीतील २५ आरोपींना आत्तापर्यंत नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 21, 2025 | 02:22 PM
हायड्रो गांजाची तस्करी प्रकरण, नेपाळ मार्गे प्रदेशात पळून जाणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी केली अटक

हायड्रो गांजाची तस्करी प्रकरण, नेपाळ मार्गे प्रदेशात पळून जाणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी केली अटक

Follow Us
Close
Follow Us:
  • हायड्रो गांजाची तस्करी प्रकरण
  • नवीन चिचकर याच्या साखळीतील २५ आरोपींना अटक
  • २६ वा आरोपी नॉर्मन शहजाद मिस्त्री उर्फ नॉडीलाही अटक
सावन वैश्य | नवी मुंबई : हायड्रो गांजाची तस्करी करणारा मुख्य आरोपी नवीन चिचकर, याच्या साखळीतील २५ आरोपींना आत्तापर्यंत नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मात्र यातील २६ वा आरोपी नॉर्मन शहजाद मिस्त्री उर्फ नॉडी, याला नेपाळ मार्गे भारताबाहेर पळून जात असताना उत्तर प्रदेशातील इमिग्रेशन शाखेने अटक केली आहे.

हायड्रो गांजा या अमली पदार्थाचा मुख्य व्यापारी हा नेपाळ मार्गे भारताबाहेर पळून जाणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती. जर हा आरोपी भारताबाहेर पळून जाण्यात यशस्वी झाला. तर त्याला पकडण्यात पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असता. आणि हीच अडचण वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी लक्षात घेतली व आरोपी विरोधात तात्काळ लुकाऊट नोटीस जारी केली. त्यानुसार उत्तर प्रदेशातील इमिग्रेशन शाखेने गोरखपूर येथील नेपाळ सीमेजवळ सोनोवली बॉर्डर येथून, नॉर्मन शहजाद मिस्त्री उर्फ नोडी याला ताब्यात घेतले. या आरोपीला अटक करून अधिक तपास करण्यासाठी एका टीमला विमानाने पाठवण्यात आल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हायड्रो गांजा या अमली पदार्थाचा मुख्य व्यापारी नॉर्मन शहजाद मिस्त्री उर्फ नोडी याच्याजवळ अधिक तपास केल्यावर, आणखी काही माहिती समोर येणार असल्यची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Jalgaon Crime: 13 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवली जीवनयात्रा; शिक्षकांच्या त्रासाचा पालकांचा आरोप

१,००० कोटी रुपयांच्या ड्रग्ज कार्टेल प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नवी मुंबईतील ड्रग्ज लॉर्ड नवीन चिचकर यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. चिचकर हा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार मानला जातो. ईडीच्या मुंबई युनिटने या प्रकरणात अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) दाखल केला आहे आणि चिचकरच्या सिंडिकेटमधील भूमिकेची चौकशी करत आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये चिचकरच्या आर्थिक नेटवर्कचीही चौकशी केली जात आहे.

ईडी पैशाच्या व्यवहारांची चौकशी

एनसीबी आणि नवी मुंबई पोलिसांनी चिचकरविरुद्ध आधीच ड्रग्ज तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. ईडी आता पैशाच्या तपशीलांची चौकशी करत आहे. एनसीबीने ३१ जानेवारी २०२५ रोजी ११.५४० किलो कोकेन, ४.९ किलो गांजा आणि ५.५ किलो अंमली पदार्थांच्या गोळ्या जप्त केल्यानंतर चिचकरविरुद्ध गुन्हा दाखल केला. हे कोकेन थायलंडमधून आयात करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती आणि मलेशियातून हद्दपार झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

१४ एप्रिल रोजी ताब्यात

नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेल (एएनसी) युनिटने १४ एप्रिल रोजी चिचकरला २.८० लाख रुपयांच्या १७.२ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केल्याप्रकरणी अटक केली. चिचकरची १५ बँक खाती सापडली आणि महाराष्ट्रात १० कोटी रुपयांच्या पाच स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये एक बेट खरेदी केल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर थायलंड आणि अमेरिकेतून हायड्रोपोनिक गांजा तस्करी केल्याचाही आरोप आहे.

Pune Crime: पुण्यात हत्येचं सत्र सुरु! चुलत भावाकडून तरुणाची हत्या, मृतदेह पोत्यात भरला आणि…

Web Title: Hydro cannabis smuggling case the accused who fled to the region via nepal was arrested by navi mumbai police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Jalgaon Crime: 13 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवली जीवनयात्रा; शिक्षकांच्या त्रासाचा पालकांचा आरोप
1

Jalgaon Crime: 13 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवली जीवनयात्रा; शिक्षकांच्या त्रासाचा पालकांचा आरोप

Pune Crime: पुण्यात हत्येचं सत्र सुरु! चुलत भावाकडून तरुणाची हत्या, मृतदेह पोत्यात भरला आणि…
2

Pune Crime: पुण्यात हत्येचं सत्र सुरु! चुलत भावाकडून तरुणाची हत्या, मृतदेह पोत्यात भरला आणि…

सागरी किनारपट्टीची सुरक्षा आजही आहे वाऱ्यावरच! किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी आवश्यक असलेल्या २३ बोटी नादुरुस्त
3

सागरी किनारपट्टीची सुरक्षा आजही आहे वाऱ्यावरच! किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी आवश्यक असलेल्या २३ बोटी नादुरुस्त

Bangalore Crime: बंगळुरूतील मंदिरात थरारक घटना! 55 वर्षीय आईने पोटच्या मुलीवर कुऱ्हाडीने केला जीवघेणा हल्ला, काय घडलं नेमकं?
4

Bangalore Crime: बंगळुरूतील मंदिरात थरारक घटना! 55 वर्षीय आईने पोटच्या मुलीवर कुऱ्हाडीने केला जीवघेणा हल्ला, काय घडलं नेमकं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.