Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: प्रेमसंबंध व पैशांच्या वादातून लॉजमध्ये 51 वर्षीय व्यक्तीने संपवलं आयुष्य; गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ येथील लॉजमध्ये प्रेमसंबंधातील तणाव व पैशांच्या वादातून 51 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 22, 2026 | 08:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • वेरूळमधील शिवसेवा लॉजमध्ये 51 वर्षीय दीपक खरात यांची आत्महत्या
  • प्रेमसंबंध, आर्थिक अडचण व ब्लॅकमेलचा आरोप
  • महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातील तणाव आणि पैशांच्या वादातून एका 51 वर्षीय व्यक्तीने लॉजच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (२० जानेवारी) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वेरूळ (ता. खुलताबाद) येथील हॉटेल शिवसेवा रेसिडेन्सी लॉजिंग अँड रेस्टॉरंट येथे घडली.

सांगली जिल्हा बँकेवर दरोडा टाकणारे दरोडेखोर अखेर सापडले; सव्वा तीन कोटींचा मारला होता डल्ला

काय प्रकरण नेमकं?

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव दीपक भाऊराव खरात (वय 51, रा. बनेवाडी, रेल्वेस्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर) असे आहे. ते वाळूज एमआयडीसीतील एका खासगी ऑटोमोबाईल कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या मुलाने या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारी नुसार, दीपक खरात यांचे जयश्री राजू बनकर (वय 46, रा. गौतमनगर, आसेफिया कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) या महिलेशी दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. या संबंधानुसार त्यांच्या घरात सातत्याने वाद होत होते.

कुटुंबीयांनी याप्रकरणी अनेकदा जयश्री सोबत असलेले संबंध तोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र दीपक यांनी ऐकलं नाही. ते आपल्या कामाचे पैसेही तिला देत असल्याने ते कायम आर्थिक अडचणीत राहत होते.

घटनेच्या दिवशी काय घडलं?

मंगळवारी दीपक खरात हे जयश्री बनकर हिच्यासोबत वेरूळ येथील शिवसेवा लॉजमध्ये गेले होते. लॉजच्या खोलीत असताना जयश्रीने त्यांच्याकडे पैशांची मागणी करत ब्लॅकमेल केले. यावरून ते मानसिक दबावाला कंटाळून दीपक खरात यांनी तिच्या समोरच गळफास घेऊन आत्महत्या केली. असे तक्रारीत म्हंटले आहे. या घटनेप्रकरणी जयश्री बनकर हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे करत आहेत.

सावकारी जाचाने व्यापाऱ्याची आत्महत्या; 42 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल, मी आता थकलोय…

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सावकारी जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवला. तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी सात सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडिओत काय?

व्हिडीओमध्ये शेख करीम म्हटलं की, “ये विक्या, मुक्या बहुत परेशान कर रहे है मुझे. मै घरवालोंसे बहुत प्यार करता हू लेकीन मै थक गया हू. मैं खुदखुशी कर रहा हू..” या व्हिडिओवरून शेख करीम हे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होते, हे स्पष्टपणे जाणवते.

Nagpur Crime: नागपुरात एकाच दिवशी दोन हत्या! नकारातून तरुणीचा खून, रामझुला पुलाखाली अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या कुठे घडली?

    Ans: वेरूळ (ता. खुलताबाद) येथील शिवसेवा रेसिडेन्सी लॉजमध्ये.

  • Que: आत्महत्येमागचे कारण काय सांगितले जाते?

    Ans: प्रेमसंबंधातील तणाव, पैशांची मागणी व मानसिक दबाव.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी काय कारवाई केली?

Web Title: Chhatrapati sambhajinagar a 51 year old man ended his life in a lodge due to a relationship and financial dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Nagpur Crime: नागपुरात एकाच दिवशी दोन हत्या! नकारातून तरुणीचा खून, रामझुला पुलाखाली अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या
1

Nagpur Crime: नागपुरात एकाच दिवशी दोन हत्या! नकारातून तरुणीचा खून, रामझुला पुलाखाली अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या

मराठवाड्यात ‘वंदे भारत’ स्लीपर डब्यांची कारबॉडी निर्मिती; ‘हे’ शहर ठरणार महत्त्वाचे राष्ट्रीय निर्मिती केंद्र
2

मराठवाड्यात ‘वंदे भारत’ स्लीपर डब्यांची कारबॉडी निर्मिती; ‘हे’ शहर ठरणार महत्त्वाचे राष्ट्रीय निर्मिती केंद्र

Kannada Outram Ghat Tunnel: ४५ मिनिटांचा प्रवास केवळ १५ मिनिटांत! मराठवाडा-खान्देश कनेक्टिव्हिटीसाठी नितीन गडकरींचा मोठा निर्णय
3

Kannada Outram Ghat Tunnel: ४५ मिनिटांचा प्रवास केवळ १५ मिनिटांत! मराठवाडा-खान्देश कनेक्टिव्हिटीसाठी नितीन गडकरींचा मोठा निर्णय

Madhyapradesh Crime: पत्नीचा भोपालमध्येच राहण्याचा हट्ट ठरला जीवघेणा; पतीने रागाच्या भरात पत्नीची केली हत्या
4

Madhyapradesh Crime: पत्नीचा भोपालमध्येच राहण्याचा हट्ट ठरला जीवघेणा; पतीने रागाच्या भरात पत्नीची केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.