Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन’; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी

दोन दिवसांपूर्वी झालेल्या खुनाच्या घटनेत पोलिस दीड तास उशिरा पोहोचल्याचा आरोप जंजाळ यांनी केला. मृताच्या नातेवाइकांचीच उलट चौकशी झाल्याचेही ते म्हणाले. आता काही वेळापूर्वी ठाण्यात काही लोक तक्रार घेऊन आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 24, 2026 | 12:03 PM
'दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन'; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी

'दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन'; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी

Follow Us
Follow Us:
  • गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ
  • पुरावे आणा, मग गुन्हा दाखल होईल
  • मुंडे आल्यापासून गुन्हे वाढल्याचा आरोप
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगर येथे उपमहापौरांनाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘तुझी पाच लाखांची सुपारी दिली आहे. जिवंत राहायचे असेल तर 10 लाख रुपये दे, नाहीतर गेम करेनट, अशी धमकी उपमहापौर तथा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना फोनवरून मिळाल्याचा आरोप आहे.

उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना सायंकाळी ७.०६ वाजता एक फोन आला. या फोननंतर जंजाळ यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठले; मात्र पोलिसांनी पुरावे आणण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकारानंतर संतप्त समर्थकांनी ठाण्यासमोर गर्दी केली. आरोपीला अटक होईपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका जंजाळ यांनी घेतली. रात्री उशिरापर्यंत ४०० ते ५०० जणांचा ठिय्या आणि घोषणाबाजी सुरू होती. या घटनेच्या निमित्ताने परिसरातील वाढती गुन्हेगारी, नशेखोरी आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही जंजाळ यांनी प्रश्न उपस्थित केले.

Lawrence Bishnoi चा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर ! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?

धमकी दिल्याचा आरोप असलेल्या पवन जैस्वाल याच्याविरुद्ध १६ ते १७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दोन वेळा एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली असून, दोनदा तडीपारीही झाली आहे, असा दावा जंजाळ यांनी केला. अशा पार्श्वभूमीवर धमकीच्या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

पुरावे आणा, मग गुन्हा दाखल होईल

धमकीप्रकरणी तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिस निरीक्षक मुंडे यांनी पुरावे घेऊन या, त्यानंतरच गुन्हा दाखल होईल, असे सांगितल्याचा आरोप जंजाळ यांनी केला. या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

खून, नशेखोरीवरूनही सवाल

दोन दिवसांपूर्वी झालेल्या खुनाच्या घटनेत पोलिस दीड तास उशिरा पोहोचल्याचा आरोप जंजाळ यांनी केला. मृताच्या नातेवाइकांचीच उलट चौकशी झाल्याचेही ते म्हणाले. आता काही वेळापूर्वी ठाण्यात काही लोक तक्रार घेऊन आले होते. मळ्यात तरुण नशा करतात, त्यांचा बंदोबस्त करा, गस्त वाढवा अशी विनंती त्यांनी पोलिसांनी केली. मात्र, पोलिसांनीच नागरिकांना संबंधित तरुणांचे फोटो काढून आणण्यास सांगितल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

मुंडे आल्यापासून गुन्हे वाढले

पोलिस निरीक्षक मुंडे हे पुंडलिकनगर ठाण्यात आल्यापासून हद्दीत गुन्हेगारी, नशेखोरी आणि खुनाच्या घटनांत वाढ झाल्याचा आरोप जंजाळ यांनी केला. आरोपीला अटक होईपर्यंत ठाण्यासमोरील आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

FAQ

नेमके काय घडले? कोणाला धमकी मिळाली?
– छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) चे उपमहापौर आणि शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून धमकी दिल्याची घटना समोर आली.

तक्रार कुठे दाखल झाली? पोलिसांनी काय केले?
– पोलिसांनी धमकी देणाऱ्या नंबरचे CDR आणि लोकेशन ट्रॅकिंग सुरू केले. जंजाळ यांना तात्पुरती पोलीस सुरक्षा वाढवली. पूर्वीही त्यांना रोड टेंडरवरून मारहाण प्रकरणात FIR झाला होता.

कायद्यात काय शिक्षा आहे?
– BNS 308 (पूर्वी IPC 384) – खंडणी: 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास BNS 351(2)(3) – जीवे मारण्याची धमकी : जर धमकीत खंडणी मागितली असेल तर 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (MCOCA) – जर आरोपी सराईत गुन्हेगार असेल तर लागू होऊ शकतो.

Web Title: Chhatrapati sambhajinagar deputy mayor rajendra janjal receives a death threat nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar News
  • crime news

संबंधित बातम्या

मैत्रिणीवरून वाद, मित्राच्या मानेवर वार करून खुनाचा प्रयत्न; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

मैत्रिणीवरून वाद, मित्राच्या मानेवर वार करून खुनाचा प्रयत्न; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Pradeep Purnekar Murder case: मुळशीत कट रचला; SIT च्या हाती लागले मोठे धागेदोरे
2

Pradeep Purnekar Murder case: मुळशीत कट रचला; SIT च्या हाती लागले मोठे धागेदोरे

Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला मोठं वळण! व्हीव्हीआयपी सुरक्षेसाठी रचला कट?
3

Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला मोठं वळण! व्हीव्हीआयपी सुरक्षेसाठी रचला कट?

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.