Lawrence Bishnoiचा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?
अखेरीस, त्याला अमेरिकेत एफबीआयने अटक केली असून, त्याला भारतात प्रत्यार्पित करण्याची तयारी सुरू आहे. अनेक प्रकरणांमध्ये हवा असलेला हिमांशू भाऊ अगदी लहान वयातच गुन्हेगारी जगताचा सूत्रधार बनला, ज्यामुळे त्याला ‘छोटा डॉन’ हे टोपणनाव मिळाले.
मैत्रिणीवरून वाद, मित्राच्या मानेवर वार करून खुनाचा प्रयत्न; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
हिमांशू भाऊने अगदी लहान वयात, अवघ्या १७ वर्षांच्या वयात गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. तो यापूर्वी बालसुधारगृहात होता. त्याला गुन्हे कसे करायचे आणि पळून कसे जायचे याची सर्व माहिती आधीपासूनच होती. २०२३ मध्ये, इंटरपोलने हिमांशू भाऊविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली. दिल्ली पोलीस, हरियाणा पोलीस आणि एनआयएने त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसह अनेक गुन्हे दाखल केले आहेत. २०२२ मध्ये, हिमांशू भाऊने हरियाणात २४ तासांच्या आत झालेल्या तीन खुनांची आणि एल्विश यादवच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली.
हिमांशू भाऊ नीरज बावाना आणि बांबीहा गँगसोबत काम करत असे आणि त्यांच्या जवळचा होता. लॉरेन्स बिश्नोई गँगचे गोल्डी ब्रार गँगसोबत तीव्र वैर आहे. हिमांशू हा हरियाणातील रोहतक येथील रितोली गावचा रहिवासी असून, तो त्याच्या गावात हिमांशू रितोली या नावाने ओळखला जात होता.
हिमांशू सुमारे २० मुलांसह बालसुधारगृहातून पळून गेला. हरियाणामध्ये हिमांशूवर खून, खंडणी आणि खुनाचा प्रयत्न यासह जवळपास ५० गुन्हे दाखल आहेत. एलविश यादव यांच्या घराबाहेरील गोळीबार, बर्गर किंगमधील खून आणि अनेक जिम मालकांवर गोळीबार करून खंडणी उकळणे यांसारख्या प्रकरणांमध्ये हिमांशू भाऊचे नाव समोर आले आहे. हिमांशू सुरुवातीला पोर्तुगालला पळून गेला आणि नंतर अमेरिकेतून भारतात एक टोळी चालवत होता. २०२३ मध्ये त्याच्याविरुद्ध लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते.
Pradeep Purnekar Murder case: मुळशीत कट रचला; SIT च्या हाती लागले मोठे धागेदोरे






