Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: सावकारी जाचाने व्यापाऱ्याची आत्महत्या; 42 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल, मी आता थकलोय…

वैजापूरमध्ये सावकारीच्या जाचाला कंटाळून बटाटा व्यापारी शेख करीम शेख चुन्नू यांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वीचा 42 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 7 सावकारांविरोधात गुन्हा

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 21, 2026 | 10:13 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सावकारांच्या तगाद्यामुळे व्यापाऱ्यावर मानसिक छळ; घरात गळफास.
  • आत्महत्येपूर्वीचा 42 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • पोलिसांकडून 7 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सावकारी जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवला. तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी सात सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Gadchiroli Accident: अंत्यविधीवरून परतताना काळाचा घाला; दीना नदी पुलावर चारचाकी कोसळून भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

नामांकित बटाटा व्यापारी

आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव शेख करीम शेख चुन्नू असे आहे. ते वैजापूर शहरातील नामांकित बटाटा व्यापारी आहे. आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांनी सावकारांनी लावलेल्या पैश्यांच्या तगादा आणि मानसिक छळातून आत्महत्या केली आहे. त्यांनी ४२ सेकंदाचा व्हिडीओ बनवला होता. त्यात त्यांनी आपली व्यथा मांडली. तो व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

व्हिडिओत काय?

व्हिडीओमध्ये शेख करीम म्हटलं की, “ये विक्या, मुक्या बहुत परेशान कर रहे है मुझे. मै घरवालोंसे बहुत प्यार करता हू लेकीन मै थक गया हू. मैं खुदखुशी कर रहा हू..” या व्हिडिओवरून शेख करीम हे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होते, हे स्पष्टपणे जाणवते.

७ सावकारांवर गुन्हा दाखल?

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरु केला आहे. शेख करीम यांनी व्हिडिओमध्ये उल्लेख केलेली नावे आणि कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ७ सावकारांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीर सावकारी आणि व्याजाच्या वसुलीसाठी दिला जाणारा त्रास या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. शेख करीम यांच्या आत्महत्येमुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर हादरलं! मुकुंदवाडी परिसरात टोळक्याचा गोळीबार; नेमकं प्रकरण काय?

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात सोमवारी पहाटे सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने थेट गोळीबार करून दहशत निर्माण केली. घरावर दगडफेक करत एका नागरिकाचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांनाही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही; मात्र संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी शुभम भिखुलाल जाट, मयूर संजय उनगे, शिवा रमेश भालेराव, गोल्या उर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर प्रशांत राऊत आणि अमर उर्फ अतुल गणेश पवार यांच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kerala News: बसमधील गैरवर्तनाचा आरोप, इन्फ्लुएन्सर तरुणीचा व्हिडीओ व्हायरल; 42 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात.

  • Que: आत्महत्येचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: बेकायदेशीर सावकारीचा तगादा व मानसिक छळ.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: व्हिडिओ व कुटुंबीयांच्या माहितीनुसार 7 सावकारांवर गुन्हा दाखल केला.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime businessman commits suicide due to harassment by moneylenders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
1

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
2

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.