Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: मित्राने भाडे न देता खोली सोडली, पण जीव गेला मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा; तिघांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगरात मित्राला भाड्याने खोली मिळवून दिल्यामुळे एका 22 वर्षीय तरुणाला मानसिक त्रास सहन करावा लागला. घरमालकाने थकीत भाड्यासाठी धमक्या देत सर्वांसमोर अपमान केल्याने महारुद्र राऊत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 14, 2026 | 01:17 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मित्रासाठी खोली मिळवून देणाऱ्या तरुणाने मानसिक तणावातून आत्महत्या केली.
  • घरमालकाने थकीत भाड्यावरून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप.
  • वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राला भाड्याने खोली मिळवून देणे हे एका तरुणाला जीवावर बेतलं आहे. मित्राने भाडे न देता खोली सोडली तर घरमालकाने मध्यस्थी करणाऱ्या तरुणाकडे पैशांची मागणी केली. (Chhatrapati Sambhajinagar Crime) एवढेच नाही तर सर्वांसमोर हातपाय तोडण्याची धमकी देखील दिली. याच मानसिक तणावात तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या घटनेने छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडाली आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime)

नेमकं काय घडलं?

महारुद्र बळीराम राऊत (22) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो खासगी कंपनीत नोकरी करीत होता. काही महिन्यापूर्वी त्याने मित्र प्रदीप मापारी व त्याची पत्नी पल्लवी मापारी यांना पवननगर परिसरातील बाबासाहेब बटुळे याची खोली भाड्याने मिळवून दिली होती. या खोलीचं भाडं दरमहा 2 हजार 800 रुपये होत. ही खोली प्रदीप व पल्लवी यांनी न सांगता व घरभाडे न देता रिकामी केली होती. (Chhatrapati Sambhajinagar Crime)

शुक्रवारी दुपारी सुमारे 12 वाजता घरमालक बाबासाहेब बटुळे महारुद्रला सोबत घेऊन त्याच्या कुटुंबीयांच्या सलून दुकानात आला. तिथे त्याने भाड्याच्या पैशांबाबत जाब विचारले. यावेळी महारुद्रने पायल आणि प्रदीपकडून पैसे मागवून देतो, असे म्हंटले. मात्र बटुळे याने त्याचा मोबाइल हिसकावून घेत भाड्याची रक्कम न दिल्यास हातपाय तोडण्याची व मारहाण करण्याची धमकी दिली. (Chhatrapati Sambhajinagar Crime)  सर्वांसमोर बाबासाहेब अपमानास्पद बोलत होता. तरीही महारुद्र आणि त्याचा भाऊ वीरभद्र राऊत यांनी तुमचे पैसे मागून देऊ असे म्हंटले. मात्र बाबासाहेब काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडले, तिघांचा मृत्यू; संभाजीनगर- गंगापूर रोडवरील धक्कादायक घटना

महारुद्राचा भाऊ वीरभद्र याने सांगितले की वडिलांच्या समोर त्याने तोंडाला येईल त्या भाषेत बोलणी केली. त्यामुळे महारुद्र लगेच घरी गेला. आई गावाला गेली असल्याने घरी कोणीही नव्हते काही वेळाने वीरभद्र घरी गेल्यावर दरवाजा उघडत नव्हता. तेव्हा त्याने खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा महारुद्र गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

अवघ्या तासाभरात महारुद्रने फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात घरमालक बाबासाहेब बटुळे, मित्र प्रदीप मापारी आणि एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.  (Chhatrapati Sambhajinagar Crime)

अन्न भासळविरोधी कारवाईची धास्ती, पनीरसह भेसळीचे दुग्धजन्य पदार्थ गायब; खुले खाद्यतेलही बाजारातून गायब

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव काय होते?

    Ans: महारुद्र बळीराम राऊत (वय 22) असे मृत तरुणाचे नाव होते.

  • Que: वादाचे मुख्य कारण काय होते?

    Ans: मित्राने भाडे न देता खोली रिकामी केल्याने घरमालकाने महारुद्रकडे पैशांची मागणी केली होती.

  • Que: पोलिसांनी कोणावर गुन्हा दाखल केला?

    Ans: घरमालक बाबासाहेब बटुळे, मित्र प्रदीप मापारी आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime friend vacated room without paying rent but the youth who mediated lost his life case registered against three individuals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

धक्कादायक ! अश्लील फोटोसाठी सातवीतील मुलीवर दबाव; ऑनलाईन ओळख झाली अन् नंतर त्याच…
1

धक्कादायक ! अश्लील फोटोसाठी सातवीतील मुलीवर दबाव; ऑनलाईन ओळख झाली अन् नंतर त्याच…

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
2

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
3

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…
4

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.