Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर संशय, निर्जन जंगलात नेलं आणि…; दोन लहान मुलांनी गावात धाव घेत सांगितला थरार

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कळंकी घाटातील जंगल परिसरात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण थरार त्यांच्या दोन लहान मुलांनी प्रत्यक्ष पाहिला. आरोपी पतीने नंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 04, 2026 | 02:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला.
  • दोन चिमुकल्या मुलांनी आईवरील हल्ला प्रत्यक्ष पाहिला.
  • आरोपी पतीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिक महिना सुरु असल्याने धोंडे जेवण सासरवाडीत सांगितले जाते. असेच धोंडे जेवण करून जात असतांना एका विवाहितेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. हा सगळं प्रकार त्याने आपल्या लहान मुलांसमोर केले. कन्नड तालुक्यातील ठाकरवाडी परिसरात ही भयंकर घटना उघडकीस आली आहे.

Uttarpradesh News: उपचारासाठी 25 हजारांची मागणी? डॉक्टरांच्या निष्काळजीपणा विरोधात विधवा महिलेची तक्रार

काय घडलं नेमकं?

कांताबाई दगडू मधे (वय 33) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपीचे नाव दगडू अशोक मधे (वय 40) असे आहे. दगडू मधे हा पत्नी आणि चार मुलांसह ठाकरवाडी येथे राहत होता. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याने मोठ्या मुली अंकिता ( १२) आणि सीमा (१०) यांना घरी ठेवले. त्यांनतर पत्नी कांताबाई आणि मुलगे शुभम (8) व हृदय (4) यांना दुचाकीवर बसवून गुजरदरी येथील सासरवाडीकडे निघाला. कळंकी घाटातील निर्जन जंगल परिसरात पोहोचल्यानंतर त्याने दुचाकी थांबवली. याच ठिकाणी पूर्वनियोजित कट रचून एका साथीदाराच्या मदतीने दोरीच्या साहाय्याने कांताबाई यांचा गळा आवळण्यात आला. श्वास गुदमरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोन चिमुकल्यांनी जंगलात घेतली धाव आणि…

आईवर सुरु असलेल्या जीवघेणा हल्ला शुभम आणि हृदय या दोन चिमुकल्या मुलांनी प्रत्यक्ष पाहिला. घाबरलेल्या अवस्थेत दोघांनी घटनास्थळावरून पळ काढत गाव गाठले आणि ग्रामस्थांना घडलेला प्रकार सांगितला. हा थरार ऐकताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कांताबाई यांचा मृत्यू झाला होता.

आरोपीने केले आत्मसमर्पण

‎घटनेनंतर आरोपी दगडू मधे याने थेट कन्नड ग्रामीण पोलिस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दुसऱ्या संशयित आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील कळंकी घाट परिसरात ही घटना घडली.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

  • Que: घटनेनंतर आरोपीने काय केले?

    Ans: आरोपी पती दगडू मधे याने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime suspicious of his wife he took her to a desolate forest and two young children rushed to the village to recount the harrowing ordeal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • aurangabad
  • Aurangabad Crime
  • crime

संबंधित बातम्या

Punjab Crime: ‘घटस्फोट घेईन पण विद्यार्थ्याला सोडणार नाही’… 20 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका; पतीची आत्महत्या
1

Punjab Crime: ‘घटस्फोट घेईन पण विद्यार्थ्याला सोडणार नाही’… 20 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका; पतीची आत्महत्या

Hyderabad Crime: संतापजनक! 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काका आणि दोन सावत्र भावांनी केला अत्याचार
2

Hyderabad Crime: संतापजनक! 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काका आणि दोन सावत्र भावांनी केला अत्याचार

Nashik Crime: आषाढीला फराळ वाटप करून घरी निघाले अन्…; जमिनीच्या वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
3

Nashik Crime: आषाढीला फराळ वाटप करून घरी निघाले अन्…; जमिनीच्या वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

Akola Crime: रक्षकच ठरला भक्षक! लग्नाचे आमिष अन्… पोलिस कर्मचाऱ्याच्या अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
4

Akola Crime: रक्षकच ठरला भक्षक! लग्नाचे आमिष अन्… पोलिस कर्मचाऱ्याच्या अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.