Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या झोन 6 मधील कर्मचारी रुपचंद बनकर याला 27,500 रुपयांची लाच घेताना एसीबीने पकडले. बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रासाठी मागितली होती लाच.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 03, 2026 | 04:48 PM
मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! (Photo Credit- X)

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले!
  • बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत
Chhatrapati Sambhajinagar: बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रासाठी तब्बल 27 हजार 500 रुपयांची लाच मागणाऱ्या महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 6 मधील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. रुपचंद धरमचंद बनकर (४७) असे अटक करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव असून, ही कारवाई २ एप्रिल रोजी करण्यात आली.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र युवा शक्ती श्रमिक कामगार संघटनेच्या माध्यमातून 50 कामगारांची नोंदणी प्रक्रिया सुरू होती. या नोंदणीसाठी कामगारांनी मागील वर्षात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (90 दिवस प्रमाणपत्र) मिळवणे अनिवार्य होते. तक्रारदाराने या प्रमाणपत्रांसाठी मनपा कार्यालयात पाठपुरावा केला असता, आरोपी रुपचंद बनकर याने प्रत्येक प्रमाणपत्रासाठी 550 रुपये याप्रमाणे एकूण 27 हजार 500 रुपयांच्या लाचेची उघड मागणी केली.

हलगर्जीपणाचा बळी ठरली आई-बाळाची जोडी! डाॅक्टरांनी फोनवरुन नर्सला दिल्या होत्या प्रसूतीच्या सूचना

एसीबीचा सापळा आणि रंगेहात अटक

लाचेची मागणी होताच तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे धाव घेतली. 1 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 2 एप्रिल रोजी मनपाच्या झोन 6 कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने बनकरला ताब्यात घेतले.

घरझडती आणि पुढील तपास सुरू

आरोपीच्या अंगझडतीत मोबाईल, वाहनाची चावी, घड्याळ आणि गॉगल यांसह काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. एसीबीच्या पथकाने आरोपीच्या घराची झडती घेण्याची कार्यवाही देखील सुरू केली असून त्याच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी केली जात आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक राजीव तळेकर आणि त्यांच्या पथकाने केली.

दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले

Web Title: Chhatrapati sambhajinagar municipal employee arrested bribe construction worker certificate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख
1

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप
2

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…
3

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…

Ramai Awas Gharkul Scam: ‘रमाई आवास’ घरकुल योजनेत मोठा घोटाळा; अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप
4

Ramai Awas Gharkul Scam: ‘रमाई आवास’ घरकुल योजनेत मोठा घोटाळा; अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.