crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला चटके दिले, तिला उपाशी ठेवलं. याच कारण केवळ एवढच की त्या अल्पवयीन मुलीला चपाती नीट बनवता येत नव्हती. ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागात समोर आली आहे. या प्रकरणी मुलीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तिच्या आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“तुमची लायकी नाही पोलीस होण्याची”; सरावासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना गावगुंडांनी केली बेदम मारहाण
याबाबत अधिकची माहिती अशी, पीडित मुलगी ही मूळ राजस्थान राज्यातील रहिवासी आहे. लॉकडाऊनच्या काळात हे कुटुंब संभाजीनगर शहरात स्थायिक झाले होते. वाळूज महानगर परिसरातील कमळापूर येथील एका अल्पवयीन मुलीने आपल्या आई- वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे. आपल्याच आई वडिलांकडून शारीरिक आणि मानसिक अत्याचार केला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलगी तिच्या आई वडिलांसह राहत होती. तिला केवळ चपाती नीट बनवता येत नसल्याने तिला नियमित मारहाण केली जात होती. तिला चटके देण्यात येत असल्याचे आरोप पीडित अल्पवयीन मुलीने केला आहे.
धक्कादायक म्हणजे तिला अनेक वेळा बाथरूममध्ये अथवा घराच्या गच्चीवर राहण्यास भाग पडले गेले. अनेक दा तिला उपाशी पोटी देखील ठेवण्यात आले आहे. ही वागणूक 1 जानेवारी 2020 ते 9 जानेवारी 2024 दरम्यान देण्यात आली असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. या वागणुकीला मुलगी कंटाळली होती. त्यामुळे अमानवी अत्याचार सहन करण्याच्या पलीकडे झाल्याने या मुलीने अखेर मौन सोडले आणि पोलिसांसमोर बोलती झाली. तिने तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यतिक वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. न्यायालयात १६७० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. वैष्णवीचा पती, सासरा, सासू, दीर, नणंदेसह एकूण ११ आरोपींविरोधात पुणे न्यायालयात हे आरोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर ५८ दिवसांनंतर ठोस पुरावे संकलित करून आरोपपत्र दाखल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
हगवणे कुटुंबियांसह एकूण ६ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यापैकी लता हगवणे, करिश्मा हगवणे व निलेश चव्हाण यांनी जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यापैकी निलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर आज (मंगळवारी) सुनावणी होणार असून, लता व करिश्माच्या जामीन अर्जावर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या जामीन अर्जांवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सर्व आरोपींविरोधात आरोप निश्चिती करून खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ होणार आहे. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भिमाशंकरच्या जंगलात नेऊन लुटल्याचा ज्येष्ठाचा बनाव; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक प्रकार उघड