संग्रहित फोटो
पुणे : लुटमारीच्या घटनांत वाढ झालेली असतानाच एका दिल्ली रहिवासी ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने पुण्याच्या रेल्वे स्थानकापासून भिमाशंकरच्या घनदाट जंगलात नेहून रिक्षा चालकाने चाकूच्या धाकाने लुटल्याचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या तपासातून ही बाब स्पष्ट झाली असून, रिक्षा चालक निघून आल्याने ज्येष्ठाने हा बनाव रचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु, या बनावामुळे पोलिसांची यामुळे तारांबळ उडाली. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी रिक्षा चालकाला नोटीस देऊन सोडले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, यातील तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे दक्षिण दिल्लीतील आहेत. ते शनिवारी भीमाशंकर येथे दर्शन घेण्यासाठी आले होते. ते सकाळी नऊच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात आले. त्यांनी बाहेर आल्यानंतर रिक्षा स्टॅंडवरून एका रिक्षा चालकाला भिमाशंकरला जाण्याबाबत विचारले. दोघांमध्ये व्यवहार ठरला. भीमाशंकरला जाऊन काही वेळ थांबून पुन्हा परत येण्यासाठी १५ हजार रुपये ठरले. रिक्षा चालकाला ज्येष्ठाने १० हजार रोख व उर्वरित रक्कम ऑनलाईन दिली. ते भीमाशंकर येथे गेले. ज्येष्ठ नागरिक दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले. परंतु, जवळपास तीन ते चार तास झाल्यानंतरही ते परत आले नाही.
चालकाने त्यांना वांरवार फोन केले. पण, फोन देखील बंद लागत असल्याने रिक्षा चालक निघून आला. तक्रारदार यांनी रिक्षा चालक सोडून आल्याच्या रागातून थेट बंडगार्डन पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तक्रार मात्र, रिक्षा चालकाने भीमाशंकर येथील घनदाट जंगलात नेहून चाकूच्या धाकाने पँटच्या खिशातून १५ हजार रोख व ऑनलाईन गुगल पेद्वारे साडे चार हजार असा १९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरल्याची तक्रार दिली. ज्येष्ठाला लुटल्याने पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद करत या रिक्षा चालकाचा शोध घेतला. त्याला काही तासांत ताब्यात घेतले. चौकशी केली असता मात्र, रिक्षा चालकाने घडलेला प्रकार सांगितला. नंतर मात्र पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली. दोन्ही बाजू पुन्हा “व्हेरीफाय”करून पोलिसांनी या रिक्षा चालकाला नोटीस देऊन सोडले.
भरदिवसा औंधमध्ये तरुणीची सोनसाखळी हिसकावली
औंध परिसरातील प्रमुख रस्त्याच्या कडेला उभारलेल्या तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे. भरदिवसा चोरट्यांनी तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याने भितीचे वातावरण आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत २५ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. हा प्रकार रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला आहे.