Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhattisgarh Crime : कुठे नेऊन ठेवलंय पवित्र नातं? शारीरिक संबंध, मद्य अन् संशय…! १०८ दिवसांत ३० पत्नींची हत्या

इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाच्या देशभर चर्चेदरम्यान छत्तीसगडमधून एक अतिशय धक्कादायक आणि भयानक बातमी समोर आली आहे. गेल्या ११५ दिवसांत, ३० महिलांची त्यांच्या पतींनी हत्या केल्याचा अहवाल समोर आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 25, 2025 | 11:36 AM
कुठे नेऊन ठेवलंय पवित्र नातं? शारीरिक संबंध, मद्य अन् संशय...! १०८ दिवसांत ३० पत्नींची हत्या (फोटो सौजन्य-X)

कुठे नेऊन ठेवलंय पवित्र नातं? शारीरिक संबंध, मद्य अन् संशय...! १०८ दिवसांत ३० पत्नींची हत्या (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Chhattisgarh Crime News In Marathi : पती आणि पत्नी यांच्यातील नात्यामध्ये विश्वास असणे अत्यंत गरजेचे असते. जर विश्वासाचा हा धागा कधी तुटला तर दोघांचेही जीवन उध्वस्त होण्याच्या मार्गावर असते. अनेकदा अशा गोष्टींसाठी संशय कारणीभूत असल्याचे समोर येत असते. असाच एक छत्तीसगडमधून धक्कादायक अहवाल समोर येत आहे. छत्तीसगडमध्ये गेल्या ११५ दिवसांत ३० महिलांची त्यांच्या पतींनी हत्या केली. जर आपण सरासरी पाहिले तर, दर चार दिवसांनी एका महिलेची हत्या केली जाते,असा धक्कादायक अहवाल समोर येत आहे.

तीन लग्न करूनही चौथ्याला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न; सासूला आला संशय आणि तिने केला…..

छत्तीसगडमध्ये १ मार्च २०२५ ते २२ जून २०२५ दरम्यान ३० महिलांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्या पतींना मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली. याचा अर्थ असा की गेल्या ११५ दिवसांत, राज्यात दर चौथ्या दिवशी, एका पत्नीची तिच्याच पतीकडून हत्या होत आहे. छत्तीसगडमध्ये पत्नींच्या हत्येच्या ३० घटनांपैकी १० हून अधिक हत्या चारित्र्याच्या संशयामुळे किंवा मत्सरामुळे, ६ नशेच्या अवस्थेत आणि दोन लैंगिक संबंधांना नकार दिल्याने झाल्या आहेत. उर्वरित हत्या घरगुती हिंसाचार, हुंडा वाद किंवा वैवाहिक तणावामुळे झाल्या आहेत.

धमतरी येथील एका तरुण जोडप्याचे लग्न होऊन फक्त तीन महिने झाले होते. ७ जून रोजी पतीने पत्नीसोबत प्रेम व्यक्त करणारा एक फोटो पोस्ट केला. तीन दिवसांनंतर त्याने विळ्याने तिचा गळा चिरला. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकारी मनीशंकर चंद्रा यांनी सांगितले की, आरोपी पती धनेश्वर पटेलने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

यापूर्वी २२ मार्च रोजी बालोद येथे एका महिला शिक्षिकेची हत्या करण्यात आली होती आणि ती रस्ता अपघात म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सखोल पोलिस तपासात असे दिसून आले की महिलेचा पती शीशपाल आणि त्याच्या मित्राने तिची हत्या केली होती आणि नंतर तो अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. आणखी एक वरिष्ठ पोलिस अधिकारी योगेश पटेल म्हणाले की, आरोपीच्या ओळखीच्या कयामुद्दीनने चौकशीदरम्यान कबूल केले की ही हत्या आधीच नियोजित होती.

लिंगाशी संबंधित गैरसमजांवर टीका

दरम्यान, समाजशास्त्रज्ञ प्राध्यापक डीएन शर्मा यांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या लिंगाशी संबंधित गैरसमजांवर टीका केली. हा निवडक आक्रोश पितृसत्ताकतेत रुजलेला आहे. पुरुषांनी हजारो हत्या केले आहेत, परंतु जर एखाद्या महिलेने असे केले तर संपूर्ण महिला समाज कलंकित होतो. खून हा खून आहे – लिंगाच्या आधारावर तीव्रता बदलू नये. काही खळबळजनक घटनांवरून महिलांना लेबल लावणे हे आपल्या पुरूषप्रधान मानसिकतेचे प्रतिबिंब आहे, असे ते म्हणाले. पत्नींना ट्रोल करणे हे केवळ चुकीचेच नाही तर धोकादायक देखील आहे.

राजा रघुवंशी हत्या प्रकरण

मध्य प्रदेशातील इंदूर येथील व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हनिमून दरम्यान हत्येच्या आरोपाखाली त्यांची नवविवाहित पत्नी सोनम रघुवंशी यांना अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर अशा पत्नींबद्दल मीम्स आणि विनोदांचा पूर आला आहे. सोनमला तिच्या पतीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याच्या खळबळजनक प्रकरणाने ऑनलाइन खळबळ उडाली आहे. अशा पत्नींना खुनी, विश्वास तोडणाऱ्या आणि गुन्हेगार म्हटले जात आहे.

Pune Crime: भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरेंवर महिला पोलीस निरीक्षकाकडून विनयभंगाचा आरोप; एफआयआर दाखल

Web Title: Chhattisgarh 30 wives murdered by husbands in 115 days chhattisgarh crime data revels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • Chhattisgarh
  • crime
  • police

संबंधित बातम्या

Solapur Crime: मुलीला मेसेज पाठवल्याचा राग, समेटाच्या बहाण्याने बोलावून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला; तरुण दोन दिवस बेशुद्ध
1

Solapur Crime: मुलीला मेसेज पाठवल्याचा राग, समेटाच्या बहाण्याने बोलावून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला; तरुण दोन दिवस बेशुद्ध

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक
2

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Buldhana Crime: ४७ वाहनांवर कारवाई, जिल्ह्यात सर्रास अवैध गौणखनिज उत्खनन
3

Buldhana Crime: ४७ वाहनांवर कारवाई, जिल्ह्यात सर्रास अवैध गौणखनिज उत्खनन

माझा मुलगा तुझ्यासोबत संबंध ठेवत आहे की नाही? नसेल, तर मीच येतो; सासऱ्यांकडून अश्लील कमेंट्स, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
4

माझा मुलगा तुझ्यासोबत संबंध ठेवत आहे की नाही? नसेल, तर मीच येतो; सासऱ्यांकडून अश्लील कमेंट्स, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.