Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच! 8 महिन्यात 14 हजार 392 तक्रारी; तब्बल ‘इतक्या’ गुन्ह्यांची नोंद

गणेशोत्सवातील तीव्र आवाजाच्या डीजेचा वाद सुरू असतानाच शहरात वर्षभर वेगवेगळ्या निमित्ताने लावलेल्या साऊंड सिस्टीमच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिक त्रस्तच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 07, 2026 | 01:10 PM
पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच! 8 महिन्यात 14 हजार 392 तक्रारी; तब्बल 'इतक्या' गुन्ह्यांची नोंद

पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच! 8 महिन्यात 14 हजार 392 तक्रारी; तब्बल 'इतक्या' गुन्ह्यांची नोंद

Follow Us
Follow Us:

पुणे : गणेशोत्सवातील तीव्र आवाजाच्या डीजेचा वाद सुरू असतानाच शहरात वर्षभर वेगवेगळ्या निमित्ताने लावलेल्या साऊंड सिस्टीमच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिक त्रस्तच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, गेल्या आठ महिन्यात पुणे पोलिसांकडे तब्बल १४ हजार ३९२ कॉल्स आवाजासंदंर्भात आले आहेत. दरम्यान, या आठ महिन्यातच ध्वनी प्रदूषणाबाबत शहरात ४१३ गुन्हे नोंदवले आहेत.

पुणे शहरात वर्षभर सण, उत्सव, मिरवणुका, खासगी पार्ट्या तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ध्वनिक्षेपकांचा वापर केला जातो. मात्र, निर्धारित मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे आणि ध्वनिक्षेपक वाजविल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. याच त्रासातून पुणेकरांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षासह विविध माध्यमातून तक्रारी केल्या आहेत. गेल्या आठ महिन्यात पोलिसांकडे या संदंर्भाने जवळपास १४ हजार ३९२ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी देखील केली. त्यानंतर याची प्राथमिक तपासणीनंतर आठ महिन्यात (जानेवारी ते ऑगस्ट) ४१३ गुन्हे नोंदवले आहेत.

पुणे शहरात यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजासंदंर्भात प्रथमच तीव्र विरोध सुरू झाला आहे. रविवारी पुणेकर नागरिकांनी मोठा मोर्चा काढून त्याला विरोध देखील केला. दरम्यान, पोलिस प्रशासनाने देखील यंदा स्पष्ट भूमिका घेत ‘चार बेस, चार टॉप’ची मर्यादा आखून दिली आहे. दहीहंडीत देखील हाच फॉम्युर्ला होता. शनिवारी बहुंताश मंडळांनी चार बेस चार टॉप लावूनच उत्सव साजरा केला. तुलनेने आवाज कमी झाला असली तरीही डेसिबलची पातळी ओलांडली गेली आहे.

पोलिसांनी कारवाईचा जोर वाढवला

पोलिसांनी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरोधात ४१३ गुन्हे दाखल केले असून, विविध उत्सव, कार्यक्रम, मिरवणूका तसेच पब, ईदच्या मिरवणुका, खासगी पार्ट्या तसेच अन्य आस्थापनांचा त्यात समावेश आहे. २०२५ मध्ये संपूर्ण वर्षभरात ध्वनीप्रदूषणाचे ४५० गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे यंदा ८ महिन्यांतच गतवर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले आहेत.

दहीहंडीत १ हजार १०० मंडळांचे रेडिंग नोंदवले

दहीहंडी उत्सवात ‘चार बेस, चार टॉप’ची मर्यादा होती. काही मंडळांनी डीजेमुक्त उत्सव साजरा केला. मात्र, उपनगरांसह काही भागांत मर्यादित साउंड सिस्टीम असूनही मोठ्या आवाजात संगीत वाजविण्यात आले. शनिवारी झालेल्या दहीहंडी उत्सवात पोलिसांनी तब्बल ११०० मंडळांचे ‘रेडिंग’ नोंदवले आहे. त्याचे परीक्षण करून नियमभंग करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाणार आहे. बिबवेवाडी परिसरात ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी एका मंडळाविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे.

ईदच्या मिरवणुकांत १४८ गुन्हे

ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांमध्ये उच्च क्षमतेच्या ध्वनिक्षेपकांचा वापर केल्याप्रकरणी एकूण १४८ गुन्हे दाखल करण्यात आले. काही ठिकाणी ध्वनीची पातळी तब्बल १३० ते १५० डेसिबलपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार ५१ मंडळांवर गुन्हे नोंदवले तर प्लाझ्मा आणि प्रेशर मीडचा वापर करणाऱ्या ९७ मंडळांवर कारवाई करण्यात आली असून, सहा डीजे सिस्टीम जप्त करण्यात आल्या आहेत.

आता गणेशोत्सवात डेसिबल मीटर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ध्वनीप्रदूषणाविरोधातील नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. ध्वनीची पातळी डेसिबल मीटरने मोजली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास ध्वनीपातळीची नोंद, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि अन्य पुरावे संकलित करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांनी ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरोधातील कारवाई गणेशोत्सवात आणखी तीव्र केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

फक्त उत्सवच नव्हे, खासगी ठिकाणीही कारवाई

पुणे शहरात आता फक्त उत्सव, सण तसेच जंयतीतच आवाजासंदंर्भात कारवाई केली जात नसून, पब, रूफटॉप कॅफे आणि अन्य आस्थापनांनाही ध्वनीप्रदूषणाच्या नियमांनुसार कारवाई सुरू आहे. बंडगार्डन, विमाननगर, खराडी, बालेवाडी, बाणेर तसेच अन्य भागातील आस्थापनांवर या संदंर्भाने कारवाई सुरू आहे. त्यामुळे उत्सवाचा जल्लोष असो अथवा पबमधील पार्टी; मर्यादा ओलांडली तर कारवाई होईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा : शेतजमिनीचा वाद विकोपाला, पुतण्याचा काकावर कुऱ्हाडीने हल्ला; समुद्रपूर तालुक्यातील घटनेनं खळबळ

३३ ठिकाणी १०० डेसिबलपेक्षा अधिक आवाज

डीजेविरोधीत पुणेकर मंचाच्या वतीने पुण्यातील विविध भागांत ध्वनी प्रदूषणाची नोंद घेतली असून, आतापर्यंत ५९ ठिकाणी ध्वनी तीव्रतेच्या उल्लंघन झाल्याचा दावा मंचाने केला आहे. ५९ पैकी तब्बल ३३ ठिकाणी आवाजाची तीव्रता १०० डेसिबलपेक्षा अधिक असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. नागरिकांनी प्रत्यक्ष ठिकाणी आवाजाची पातळी आणि स्थानाची नोंद करून हा डेटा संकलित केला. शहरातील विविध भागांतून तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यामुळे मंचाने ध्वनी प्रदूषण नियंत्रणासंदंर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Web Title: Citizens of pune city are being troubled by the noise of djs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • crime news
  • ganesh utsav
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला दांडी; वॉरंटधारक आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या
1

पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला दांडी; वॉरंटधारक आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या

शेतजमिनीचा वाद विकोपाला, पुतण्याचा काकावर कुऱ्हाडीने हल्ला; समुद्रपूर तालुक्यातील घटनेनं खळबळ
2

शेतजमिनीचा वाद विकोपाला, पुतण्याचा काकावर कुऱ्हाडीने हल्ला; समुद्रपूर तालुक्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?
3

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?

Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्या प्रकरणी मोठी कारवाई; पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एकाला ठोकल्या बेड्या
4

Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्या प्रकरणी मोठी कारवाई; पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एकाला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.