Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मित्राच्या भांडणात मध्यस्थी भोवली, एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

महाविद्यालयातील भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून चौघांनी एलएलबीच्या विद्यार्थ्याला अडवून चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १७ ऑक्टोबर रोजी दुपारी एन-६ सिडकोतील सैलानी बाबा व्हील अलाइनमेंट सेंटरसमोर घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 20, 2026 | 12:40 PM
मित्राच्या भांडणात मध्यस्थी भोवली, एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

मित्राच्या भांडणात मध्यस्थी भोवली, एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला
  • संभाजीनगरच्या सिडको परिसरात दोघे तरुण जखमी
  • हर्ष, स्वप्नील, संकेत राठोड आणि सोन्याविरोधात गुन्हा दाखल.
छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयातील भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून चौघांनी एलएलबीच्या विद्यार्थ्याला अडवून चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या उजव्या हाताच्या बोटांना, तर त्याचा मित्रावरही चाकूने वार करुन गंभीर दुखापत करण्यात आली आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार १७ ऑक्टोबर रोजी दुपारी एन-६ सिडकोतील सैलानी बाबा व्हील अलाइनमेंट सेंटरसमोर घडला आहे.

 

हर्ष राठोड, स्वप्नील राठोड, संकेत राठोड, सोन्या अशी चाकू हल्ला करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रितमसिंग देविचंद बारवाल (वय २२, रा. भगतसिंगनगर, हसुल) याने फिर्याद दिली आहे.

प्रितमसिंग हा एका नामांकित महाविद्यालयात एलएलबीच्या द्वितीय वर्षात शिकतो. १३ ऑक्टोबर रोजी त्याचा मित्र सौरभ पाटील याचे हर्ष राठोड व स्वप्निल राठोड यांच्याशी महाविद्यालय परिसरात भांडण झाले होते. त्यावेळी प्रितमसिंगने मध्यस्थी करून भांडण सोडवले होते. शनिवारी दुपारी प्रितमसिंग हा मित्र दिग्विजयसोबत दुचाकीवरून जात असताना हर्षने बुलेट आडवी लावून त्याला रोखले. त्याच्यासोबत स्वप्निल, संकेत राठोड आणि सोन्या असे तिघे होते. हर्षने जुन्या भांडणाचा जाब विचारत चाकूने प्रितमसिंगवर वार करण्याचा प्रयत्न केला. प्रितमसिंगने चाकू हाताने पकडल्याने त्याच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. मित्राच्या मदतीला धावलेल्या दिग्विजयला स्वप्निल व संकेत यांनी पकडले. त्यानंतर सोन्याने दिग्विजयच्या डाव्या मांडीवर व उजव्या कोपरावर चाकूने वार केले. नागरिक जमा होऊ लागल्याने चौघेही आझाद चौकाच्या दिशेने पसार झाले. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार गताप करत आहेत.

हे सुद्धा वाचा : डिस्काउंट न दिल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखले; मोशीत खळबळ

पुण्यातील वडारवाडी परिसरात खळबळ

जुन्या वैमनस्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान हल्ल्यात झाल्याची घटना शिवाजीनगरमधील वडारवाडी परिसरात घडली आहे. एका व्यक्तीच्या गळ्यावर ब्लेडने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी मोहन बळवंत विटकर (वय ३६, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) याला अटक केली आहे. या हल्ल्यात राहुल शिवराम डोंगरे (वय ४०, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी डोंगरे यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चाकू हल्ल्याची घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरमधील एन-६ सिडको परिसरात सैलानी बाबा व्हील अलाइनमेंट सेंटरसमोर १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ही घटना घडली.

  • Que: एलएलबीच्या विद्यार्थ्यावर हल्ला का करण्यात आला?

    Ans: महाविद्यालयात झालेल्या जुन्या भांडणात विद्यार्थ्याने मध्यस्थी करून वाद मिटवला होता. याचाच राग मनात धरून चौघांनी त्याला अडवून चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.

  • Que: या हल्ल्यात किती जण जखमी झाले?

    Ans: या हल्ल्यात एलएलबीचा विद्यार्थी प्रितमसिंग बारवाल याच्या उजव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली, तर त्याचा मित्र दिग्विजय याच्यावरही चाकूने वार करण्यात आले. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: An incident has occurred in sambhajinagar where an llb student was attacked with a knife nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Sambhajinagar Crime

संबंधित बातम्या

डिस्काउंट न दिल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखले; मोशीत खळबळ
1

डिस्काउंट न दिल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखले; मोशीत खळबळ

दारूच्या नशेत शिवीगाळ, नंतर थेट ब्लेडने हल्ला! पुण्यातील वडारवाडी परिसरात खळबळ
2

दारूच्या नशेत शिवीगाळ, नंतर थेट ब्लेडने हल्ला! पुण्यातील वडारवाडी परिसरात खळबळ

Breaking News : जगाला हादरवणाऱ्या उपासमारीच्या हत्याकांडाचा निकाल आला ; ३० जण हत्या प्रकरणात दोषी
3

Breaking News : जगाला हादरवणाऱ्या उपासमारीच्या हत्याकांडाचा निकाल आला ; ३० जण हत्या प्रकरणात दोषी

सासरच्या छळाला कंटाळून हिनाने संपवले जीवन; पतीसह तिघांवर पोलिसांची मोठी कारवाई
4

सासरच्या छळाला कंटाळून हिनाने संपवले जीवन; पतीसह तिघांवर पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.