
डिस्काउंट न दिल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखले; मोशीत खळबळ
या प्रकरणी देवानंद उर्फ देवा भिमाशंकर जमादार (वय २९, देहूरोड, किवळे, पुणे), सुलतान इसुफ खान (३२, देहुरोड, पुणे), विलास धाऊ ढेबे (वय २९, दिघी, पुणे), काशिनाथ कल्याण काळे (वय २८, दिघी-आळंदी रोड, पुणे) या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह कुणाल साहेबराव रणवीर (वय २२, म्हाळुंगे, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघजाई पेट्रोल पंप, मोशी येथे काम करतात. रविवारी पहाटे ते पंपावर काम करत असताना एक कार पेट्रोल पंपावर आली. कारमध्ये चार जण बसलेले होते. त्यातील एकाने ऑइलचा भाव विचारला. फिर्यादी रेवन यांनी ऑइलचा भाव सांगितला. ऑइल खरेदीमध्ये डिस्काउंट बाबत आरोपींनी विचारणा केली.
हे सुद्धा वाचा : २ लाख रुपये कमावण्याचं आमिष दाखवलं; गोळीबार प्रकरणातील रेहानच्या आईचा दावा
डिस्काउंट न दिल्याच्या राग
मात्र त्याचा भाव फिक्स असून त्यामध्ये कोणताही डिस्काउंट मिळणार नसल्याचे रेवन यांनी सांगितले. ऑइलचा भाव जास्त असल्याने ते खरेदी करणार नसल्याचे सांगून आरोपी कारमध्ये बसून पेट्रोल पंपाच्या एका बाजूला गेले. काही वेळाने आरोपी पुन्हा खाली आणि त्यांनी एक लिटर ऑइल खरेदी केले. त्यानंतर डिस्काउंट न दिल्याच्या रागातून एका आरोपीने धमकी देत आपल्या कमरेला लावलेले पिस्तूल काढून रेवन यांच्या दिशेने रोखले, ज्यामुळे आजूबाजूचे ग्राहक पळून गेले. त्यानंतर ते चौघे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून निघून गेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
Ans: ही घटना रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी पहाटे पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील वाघजाई पेट्रोल पंपावर घडली.
Ans: एक लिटर ऑइल खरेदी करताना आरोपींनी डिस्काउंटची मागणी केली. मात्र, ऑइलचा दर निश्चित असल्याने डिस्काउंट मिळणार नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. याच रागातून एका आरोपीने पिस्तूल रोखून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
Ans: या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, आणखी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.