Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ४८ तासांनंतर संशयित कर्नाटकातून ताब्यात

नवरात्रोत्सवानिमित्त चंद्रप्रभू मंदिरात आरती करून घरी परतणाऱ्या अवघ्या १५ वर्षीय स्वरा नितीन उपाध्ये हिची धारदार शस्त्राने वार करून हत्या करणारा संशयित आरोपी अरुण लगम्मावर (वय ३७, रा. माणगाव) याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 20, 2026 | 01:01 PM
स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ४८ तासांनंतर संशयित कर्नाटकातून ताब्यात

स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ४८ तासांनंतर संशयित कर्नाटकातून ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणातील संशयित ताब्यात
  • १५ वर्षीय स्वराची धारदार शस्त्राने हत्या
  • हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट
कोल्हापूर : नवरात्रोत्सवानिमित्त चंद्रप्रभू मंदिरात आरती करून घरी परतणाऱ्या अवघ्या १५ वर्षीय स्वरा नितीन उपाध्ये हिची धारदार शस्त्राने वार करून हत्या करणारा संशयित आरोपी अरुण लगम्मावर (वय ३७, रा. माणगाव) याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा तब्बल ४८ तासांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सदलगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शोध लागला. मात्र, आरती करून घरी परतणाऱ्या निष्पाप स्वराची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली ? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असून, आरोपीच्या चौकशीतून हत्येमागील कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

 

या घटनेने माणगाव (ता. हातकणंगले) परिसरात संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांनी कँडल मार्च काढून कठोर कारवाईची मागणी केली आहे. स्वरा ही इयत्ता नववीमध्ये शिकत होती. नवरात्रोत्सवानिमित्त ती दररोज चंद्रप्रभू मंदिरात आरतीसाठी जात असे. शनिवारी रात्रीही ती नेहमीप्रमाणे मंदिरात गेली होती. आरती संपल्यानंतर घरी परतत असताना मंदिराशेजारील अरुंद गल्लीत संशयित आरोपीने तिला एकटीला गाठून धारदार शस्त्राने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात स्वरा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळविले.

चार पथकांकडून शोध, अखेर कर्नाटकात जाळ्यात

घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तीन आणि हातकणंगले पोलिसांचे एक अशी चार पथके तैनात करण्यात आली होती. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांसह कर्नाटकातही शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर ४८ तासांनंतर सदलगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपीचा शोध लागला. सदलगा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून, त्याला महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया अपेक्षित आहे.

हे सुद्धा वाचा : मित्राच्या भांडणात मध्यस्थी भोवली, एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

खुनामागचे कारण काय? तपासाकडे लक्ष

स्वराची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. आरोपीने हा हल्ला का केला, त्यामागे वैयक्तिक कारण होते की अन्य काही कारण, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे आरोपीच्या चौकशीतून हत्येमागील गूढ उकलण्याची शक्यता आहे. पोलिस तपासातूनच या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. स्वराच्या मृत्यूनंतर माणगावमध्ये शोककळा पसरली आहे. घटनेच्या निषेधार्थ अत्यावश्यक सेवा वगळता गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले. सायंकाळी ग्रामस्थांनी कँडल मार्च काढून स्वराला श्रद्धांजली अर्पण केली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात स्वराच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. गळ्यावरील खोल जखम आणि इतर गंभीर जखमांमुळे अतिरक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणातील संशयिताला कुठून ताब्यात घेतले?

    Ans: स्वरा उपाध्ये हिच्या हत्या प्रकरणातील संशयित अरुण लगम्मावर याला घटनेनंतर तब्बल ४८ तासांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सदलगा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले.

  • Que: स्वरा उपाध्ये हिची हत्या कशी झाली?

    Ans: नवरात्रोत्सवानिमित्त चंद्रप्रभू मंदिरात आरती करून घरी परतत असताना मंदिराशेजारील अरुंद गल्लीत स्वरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.

  • Que: स्वरा उपाध्ये हिच्या हत्येमागील कारण काय आहे?

    Ans: स्वराची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयिताच्या चौकशीतून हत्येमागील कारण समोर येण्याची अपेक्षा आहे. या घटनेनंतर माणगाव परिसरातील ग्रामस्थांनी कँडल मार्च काढून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: The police have taken major action in the swara upadhye murder case nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

मित्राच्या भांडणात मध्यस्थी भोवली, एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
1

मित्राच्या भांडणात मध्यस्थी भोवली, एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

डिस्काउंट न दिल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखले; मोशीत खळबळ
2

डिस्काउंट न दिल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखले; मोशीत खळबळ

दारूच्या नशेत शिवीगाळ, नंतर थेट ब्लेडने हल्ला! पुण्यातील वडारवाडी परिसरात खळबळ
3

दारूच्या नशेत शिवीगाळ, नंतर थेट ब्लेडने हल्ला! पुण्यातील वडारवाडी परिसरात खळबळ

Breaking News : जगाला हादरवणाऱ्या उपासमारीच्या हत्याकांडाचा निकाल आला ; ३० जण हत्या प्रकरणात दोषी
4

Breaking News : जगाला हादरवणाऱ्या उपासमारीच्या हत्याकांडाचा निकाल आला ; ३० जण हत्या प्रकरणात दोषी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.