Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्…

सपना यांचा मृतदेह रविवारी रात्री घरातील बाथरुममध्ये आढळला. सुरुवातीला त्या बाथरुममध्ये घसरून पडल्याचा बनाव करण्यात आला. मात्र, त्यांच्या गळ्यावर काळे-निळे वळ आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आढळल्याने पोलिसांना संशय आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 21, 2026 | 12:24 PM
सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्...

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्...

Follow Us
Follow Us:

मुंबई : घाटकोपरमध्ये ३५ वर्षीय सपना घानजी यांच्या मृत्यूचा धक्कादायक उलगडा झाला आहे. सुनेची हत्या करण्यासाठी सासू धनलक्ष्मी घानजी (वय ६५) यांनी घरकाम करणाऱ्या महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले. याप्रकरणी सासूसह चौघांना अटक करण्यात आली आहे.

सपना यांचा मृतदेह रविवारी रात्री घरातील बाथरुममध्ये आढळला. सुरुवातीला त्या बाथरुममध्ये घसरून पडल्याचा बनाव करण्यात आला. मात्र, त्यांच्या गळ्यावर काळे-निळे वळ आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आढळल्याने पोलिसांना संशय आला. सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे तपास केल्यानंतर हत्येचा कट उघडकीस आला. सपना यांनी २०२४ मध्ये सासरच्यांविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार केली होती. त्यांच्या विवाहबाह्य संबंधांबाबत सासूला संशय असल्याचेही तपासात समोर आले आहे.

खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्…

घरगुती छळाची होती तक्रार

पोलिसांच्या माहितीनुसार, धनलक्ष्मी यांनी घरकाम करणाऱ्या मंगला जाधव हिला तीन लाख रुपये देण्याचे कबूल केले. या कटात मंगलाचा पती सुरेश, मुलगी शिवानी (वय २१) आणि मुलगा साजन (वय १९) सहभागी झाले. रविवारी भांडण मिटवण्याच्या बहाण्याने धनलक्ष्मी सपना यांच्या घरी गेल्या. त्यानंतर आरोपींनी सपना यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून, काचेच्या ग्लासने डोक्यावर प्रहार केला आणि ओढणीने गळा आवळला. त्यानंतर गळ्यावर पाय दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

विद्यार्थ्यांनी केली मुख्याध्यापिकेची हत्या

तेलंगणातील एका शाळेच्या मुख्याध्यापिका कल्लू रूपा रेड्डी यांच्या हत्या प्रकरणात दहावीतील 2 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रूपा रेड्डी या कोंडा मल्लेपल्ली येथील नागार्जुन पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि संचालिका होत्या. १२ ऑगस्टला सकाळी त्या त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या शरीरावर चाकूने २७ वार करण्यात आले होते.

Thane Crime : किन्नर बनून घरात शिरला, ‘संतानप्राप्ती’च्या नावाखाली अनुष्ठानाचा बहाणा अन् महिलेवर अत्याचार; पवईतील धक्कादायक घटना

Web Title: Contract given to maid to murder woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • crime news
  • Mumbai Crime
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार
1

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?
2

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई
3

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई

निलंबित एपीआयच्या  आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?
4

निलंबित एपीआयच्या आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.