crime (फोटो सौजन्य: social media)
नागपूर शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून गावी जाणाऱ्या दाम्पत्याचा अपघात झाला. या दुर्घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मदत मागूनही मदत न मिळाल्याने हतबल पतीने मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा निर्णय घेत घर गाठलंय. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत असून नेटकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. ही घटना शहरातील नागपूर- जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडली असल्याचे सांगितलं जातंय.
नेमकं काय घडलं?
पुढे आलेल्या माहितीनुसार, ग्यारसी अमित यादव असे मृत महिलेचे नाव आहे तर अमित यदाव असे पतीचे नाव आहे. देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात रविवारी (10ऑगस्ट ) दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास मागून वेगात आलेल्या ट्रकने कट लागल्याने पत्नीपडून ट्रकच्या चाकाखाली आली. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मादीसाठी कोणीही वाहन थांबवायला तयार नव्हतं, अथवा कुणीही माणुसकी दाखवायला तयार झालं नाही. यावेळी हतबल पती अमित यादवने डोळ्यांतून अश्रू पुसत हात जोडून वाहनांना थांबविण्याचा ही प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.
म्हणून त्यांनी पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधला आणि घरी मध्यप्रदेशला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. पती- पत्नी हे मध्यप्रदेशच्या सिवनी येथील रहिवासी आहे. ते मागील १० वर्षांपासून पती अमित भुरा यादव (35) याच्यासोबत कोराडी नजीकच्या लोणारा येथे राहत होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने अमित मोटारसायकलने लोणार येथून देवलापारमार्गे करणपूरला जात होता. त्यावेळी हा अपघात झाला. सुरवातीला मदतीची याचना करत कोणताही वाहन थांबले नाही, मात्र मृतदेह दुचाकीवर नेतांना अनेकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र भीतीने तो थांबायला तयार नव्हता. महामार्ग पोलिसांनी त्याला अडवून ग्यारसीचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविला.
चालकाला झोप लागली अन्…; मंगळवेढ्याजवळ रासायनिक द्रव्याचा टँकर पलटी
आता सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला धडकून टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा हद्दीत ही दुर्घटना घडली आहे. इथाईल ऍसिटेट या रसायनाची वाहतूक केली जात होती. अपघातानंतर महामार्गावर वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्याने पोलिसांनी सध्या वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे.
अपघातस्थळी मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणातील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित केली. सकाळी ७.३० वा दरम्यान टँकर (एपी ३१ व्हीसी ८२२७) इथाईल ऍसिटेट रसायन आंध्र प्रदेशात घेऊन निघाला होता. चालकाला झोप लागल्यामुळे टँकर डिव्हायडरला धडकला. टँकरमधील रसायन हा ज्वलनशील असल्यामुळे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक तत्काळ बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पोलिसांनी थोड्या प्रमाणात वाहने सोडण्यास सुरुवात केली.