मुंबईच्या विरार मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला तिच्या अंगात भूत असल्याचे सांगत तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी बलात्कार करणारा मुख्य आरोपी हा अंध आहे. तर दुसऱ्या आरोपीने त्याला लॉजवर नेण्यासाठी मदत केल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Pune Crime News : पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले
नेमकं काय घडलं?
पीडित मुलगी ही १७ वर्षाची असून अकरावीच शिक्षण घेत आहे. या पीडित अल्पवयीन मुलीच्या अंगात येत असल्याने फिर्यादीच्या मित्राने तिला आरोपी प्रेम पाटीलचं नाव सांगितलं. प्रेम पाटील हा २१ वर्षाचा आहे तो जन्मतः आंधळा आहे.
आरोपी प्रेम पाटीलने पहिला तिला अंगारा दिला. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. आरोपीने पीडितेला सांगितले की तुच्या अंगात चार भूत आहेत, हे तुच्या भविष्यासाठी चांगले नाही आहे. तुला बाळ होणार नाही. तुझा नवरा पण जिवंत राहणार नाही असं सांगत भीती घातली. त्यानंतर तिच्या अंगातील भूत काढण्यासाठी एका लॅाजवर नेलं. त्या ठिकाणी मुलीच्या अंगावर लिंबू फिरवून, तिच्या अंगातील भूत काढण्यासाठी आरोपीने शारीरिक संबंध ठेवले.
त्याने पुढे म्हंटल की अंगातील भूत काढण्यासाठी असेच ११ वेळा शारीरिक संबंध ठेवावे लागतील, तेव्हाच भूत जाईल. याबाबत कोणालाही सांगू नकोस असंही म्हंटल. मात्र आरोपी आपली फसवणूक करत असल्याचे त्या मुलीला समजले. तिने विरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. विरार पोलिसांनी आरोपी प्रेम पाटील आणि मुलीला लॅाजवर नेण्यासाठी मदत करणाऱ्या करण पाटील या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात बलात्कार, पोक्सो आणि महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना 11 ॲागस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संतापजनक! भाडे देऊ नका, फक्त मला…; लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरूणीचा विनयभं
पुणे जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पिकअप चालकाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अंधाराचा फायदा घेऊन तरूणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान याप्रकरणी पिकअप चालक नंदु जाधव (वय २५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ ऑगस्ट रोजी सव्वा अकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याबाबत २६ वर्षीय तरूणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.