Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स

अमेरिकेत भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे, दुसऱ्याच दिवशी त्याने पत्नीच्या मृतदेहाचा फोटो भारतातील प्रेयसीला पाठवला. नऊ महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून जामिनासाठी 50 लाख डॉलर्सची अट ठेवण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 09, 2026 | 07:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला अमेरिकेत अटक.
  • हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी पत्नीच्या मृतदेहाचा फोटो भारतातील प्रेयसीला पाठवल्याचा आरोप.
  • नऊ महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांची कारवाई; जामिनासाठी 50 लाख डॉलर्सची अट.
अमेरिका: अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नीची हत्या करून दुसऱ्याच दिवशी तिच्या मृतदेहाचा फोटो भारतातील प्रेयसीला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला हा मृत्यू संशयास्पद मानला जात असला, तरी तब्बल नऊ महिन्यांच्या सखोल तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला अटक केली आहे. दोषी ठरल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याला जामिनासाठी ५० लाख डॉलर्स (अंदाजे 48 कोटी रुपये) भरावे लागतील.

काय नेमकं प्रकरण?

आरोपीचे नाव अविनाश नार्ने असे आहे. तो तेलंगणा येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. तो अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याने 5 जून, 2025 रोजी 27 वर्षीय रजिथा सब्बिननी हिच्याशी लग्न केले होते. मात्र लग्नाच्या पाच महिन्यांनी पत्नीचा मृत्यू झाला. 27 ऑक्टोबर, 2025 रोजी अविनाशने पोलिसांना फोन करून कळवले की त्याची पत्नी बाथरूममध्ये बंद आहे आणि दरवाजा उघडत नाहीये. पोलिसांनी दरवाजा तोडल्यावर आतमध्ये रजिताचा मृतदेह आढळला. त्याने दावा केला की तो सुमारे 40 मिनिटांसाठी घराबाहेर गेला होता आणि परत आला तेव्हा त्याला त्याची पत्नी बाथरूममध्ये बंद आढळली.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी तपासादरम्यान पोलिसांनी अपार्टमेंटच्या स्मार्ट लॉक आणि सुरक्षा प्रणालीमधील डेटा तपासला. यातून असे दिसून आले की अविनाश बाहेर असताना अपार्टमेंटमध्ये इतर कोणीही प्रवेश केला नव्हता. यानंतर, पोलिसांनी बाहेरील व्यक्तीच्या सहभागाची शक्यता नाकारली. शवविच्छेदन अहवालात असे उघड झाले की गळा दाबल्यामुळे गुदमरून रजिताचा मृत्यू झाला होता. यानंतर हा प्रकार हत्येचा असल्याचे समोर आले आहे.

Meghalaya Honeymoon Murder: ‘मी निर्दोष आहे, मला अडकवण्यात आलं’; सर्वोच्च न्यायालयात सोनम रघुवंशीचा मोठा दावा

स्मूदीची चव औषध आणि खोकल्याच्या सिरपसारखी

पोलिसांना रजिता आणि अविनाश यांच्यातील चॅट्ससुद्धा सापडले. यामध्ये, रजिताने तिच्या पतीच्या पेयांच्या कडू चवीबद्दल वारंवार तक्रार केली होती. तिच्या मृत्यूच्या दिवशी, तिने त्याला मेसेज करून सांगितले की, त्याने बनवलेल्या स्मूदीची चव औषध आणि खोकल्याच्या सिरपसारखी लागत आहे. जेव्हा पोलीस घरी पोहोचले, तेव्हा अविनाशने सांगितले की त्याच्या पत्नीची प्रकृती ठीक नव्हती आणि खोकल्याचे सिरप प्यायल्यानंतर ती बाथरूममध्ये कोसळली असावी.

पत्नीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला…

तपासात असे उघड झाले की अविनाशचे भारतात राहणाऱ्या एका महिलेसोबत अनेक वर्षांपासून संबंध होते. याच काळात त्याचे राजितासोबत ठरवून लग्न झाले. त्याची प्रेयसीसुद्धा लग्नाला उपस्थित होती. लग्नानंतरही ते दोघे सतत संपर्कात होते. हत्येच्या दिवशी, अविनाशने त्याच्या प्रेयसीशी किमान चार वेळा संवाद साधला होता. चौकशीदरम्यान, त्याने हे देखील कबूल केले की पत्नीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी त्याने प्रेयसीला राजिताच्या मृतदेहाचा फोटो पाठवला होता.

आरोपी अटकेत

रजिताच्या मृत्यूनंतर, पोलिसांनी अनेक महिने डिजिटल रेकॉर्ड, कॉल डिटेल्स आणि इतर पुरावे गोळा करण्यात घालवले. यानंतर, जुलै 2026 मध्ये अविनाशची पुन्हा चौकशी करण्यात आली आणि प्रथम श्रेणी हत्येच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. दोषी ठरल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याला जामिनासाठी ५० लाख डॉलर्स (अंदाजे 48 कोटी रुपये) भरावे लागतील. पोलीस अधिक तपास आणि कारवाई करत आहे.

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीवर कोणता आरोप आहे?

    Ans: पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा.

  • Que: आरोपीने हत्येनंतर काय केले?

    Ans: पत्नीच्या मृतदेहाचा फोटो प्रेयसीला पाठवला.

  • Que: आरोपीच्या जामिनासाठी किती रक्कम निश्चित करण्यात आली?

    Ans: 50 लाख डॉलर्स (सुमारे 48 कोटी रुपये).

Web Title: Crime indian engineer arrested for strangling wife to death and sending a photo of the body to his girlfriend the very next day bail set at 5 million

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 07:05 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
1

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
2

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
3

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
4

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.