Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime news updates: विद्येच्या माहेरघरात चाललंय तरी काय? आधी काढली मुलीची छेड, नंतर लिफ्टमध्ये अर्धा तास ठेवलं डांबून…..

Crime news in Marathi: आज 24 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रातील, देश आणि विदेशातील गुन्हेगारी संदर्भातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 24, 2025 | 06:12 PM
CRIME NEWS

CRIME NEWS

Follow Us
Close
Follow Us:

पुण्याला विद्येचे माहेरघर असं म्हंटल जात. परंतु गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सतत अत्याचाराचाच्या हत्येच्या घटना समोर येतांना पाहायला मिळत आहे. अश्यातच मुलीची छेड काढून तिला अर्धा तास लिफ्टमध्ये डांबून ठेवण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील शिक्षण क्षेत्रातील दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील कात्रज गोकुळनगर येथील टाकळकर क्लासेसमध्ये घडली. येथे परप्रांतीय कर्मचाऱ्याकडून मुलीची छेड काढून तिला अर्धा तास लिफ्टमध्ये डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराध्यक्ष महेश पांडुरंग भोईबार यांनी माणसे स्टाईलने चोप दिला आहे. सदर विषयाची माहिती मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीला धडा शिकवला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.

The liveblog has ended.
  • 24 Apr 2025 06:06 PM (IST)

    24 Apr 2025 06:06 PM (IST)

    सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

    पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पती तसेच सासू-सासरे व इतर नातेवाईक यांच्या सततच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने गळफासवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहत्या घरात तिने गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहिनी आकाश करनुरे (वय २१, रा. देवाची ऊरळी, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मोहिनी हिचे वडिल ज्ञानेश्वर माशाळे (वय ४६, रा. उमरगा, जि. धाराशिव) यांनी फुरसुंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. यानूसार पोलिसांनी पती आकाश विलास करनुरे, सासरे विलास नारायण करनुरे व सासू शोभा विलास करनुरे यांना अटक केली आहे.

  • 24 Apr 2025 05:47 PM (IST)

    24 Apr 2025 05:47 PM (IST)

    पहलगामच्या दहशतवाद्यांची नावं

    जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशवादी हल्ला झाला. हा हल्ला तीन दहशतवाद्यांनी केला. यांची ओळख पटली आहे. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख सुरक्षा यंत्रणांनी पटवली आहे. यामध्ये आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा. तिन्ही हल्लेखोर द टेररिस्ट फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. त्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शींशी झालेल्या संभाषणाच्या आधारे एजन्सींनी हल्लेखोरांचे रेखाचित्र देखील जारी केले आहेत. सुरक्षा एजन्सींच्या मते, दहशतवाद्यांनी त्यांची खरी ओळख लपविण्यासाठी कोड नावे वापरली. त्यांची सांकेतिक नावे मुसा, युनूस आणि आसिफ आहेत.

  • 24 Apr 2025 05:25 PM (IST)

    24 Apr 2025 05:25 PM (IST)

    सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

    सासरी होणार्‍या शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी तिचा पती व सासर्‍याला अटक केली आहे. आकाश विलास करनुरे (वय २७) आणि विलास नारायण करनुरे (वय ५६, दोघे रा. ओसवाल मळा, देवाची ऊरळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मोहिनी आकाश करनुरे (वय २१, रा. ओसवाल मळा, देवाची ऊरळी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

  • 24 Apr 2025 04:34 PM (IST)

    24 Apr 2025 04:34 PM (IST)

    उपलेखापाल लाचलुचपतच्या जाळ्यात

    दक्षिण सोलापुरातील बोरामणी येथील मजूर सोसायटीबाबत केलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी सोसायटीच्या बाजूने अहवाल देण्यासाठी ३० हजारांची लाचेची मागणी करून पहिला हप्ता दहा हजार रुपये स्वीकारताना सहकारी संस्था वर्ग - ३ च्या कार्यालयातील उपलेखापालला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शिवाजी उंबरजे (वय ५७, रा. यशवंत हाऊसिंग सोसायटी कुमठा नाका) असे त्याचे नाव असून त्याला पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली.

  • 24 Apr 2025 03:51 PM (IST)

    24 Apr 2025 03:51 PM (IST)

    मुजोर कारचालकाचा प्रताप, दुचाकीस्वारांना चिरडण्याचा प्रयत्न

    नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील सिबल हॉटेलजवळील सिग्नलवर केवळ दुचाकी बाजूला न घेतल्याच्या रागातून एका कारचालकाने दुचाकीस्वाराचा पाठलाग करत तीन वेळा कट मारला आणि चौथ्या वेळी थेट धडक दिल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 20) रात्री घडली होती. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून संबंधित कारचालकाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

  • 24 Apr 2025 03:11 PM (IST)

    24 Apr 2025 03:11 PM (IST)

    त्र्यंबकेश्वरमध्ये साधूची हत्या; दोन जणांना अटक

    त्र्यंबकेश्वरमध्ये साधूच्या वेशात असलेल्या एका व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामध्ये साधूच्या वेशातील व्यक्तीला दोन जण मारहाण करताना दिसत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

  • 24 Apr 2025 02:08 PM (IST)

    24 Apr 2025 02:08 PM (IST)

    चकमकीत दोन हिस्ट्रीशीटरना अटक, एकाला गोळी लागली

    बुधवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत सिरसागंज पोलिस ठाण्याने दोन हिस्ट्रीशीटरना अटक केली आहे. पायात गोळी लागल्याने जखमी झालेल्या एका आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण), अखिलेश भदोरिया यांनी सांगितले की, १४ एप्रिल रोजी सिरसागंज पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी नागला चांडी गावासमोरील आरव रोडवर मोबाईल लुटल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे उघड करण्यासाठी पोलिसांच्या तीन पथके तैनात करण्यात आली.

  • 24 Apr 2025 02:08 PM (IST)

    24 Apr 2025 02:08 PM (IST)

    आंबेगाव तालुक्यात तरुणाची आत्महत्या, चुलता अन् चुलतीला अटक; कारणही आलं समोर

    मंचर : थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे जमिनीच्या वादातून चुलता आणि चुलतीकडून होणाऱ्या वारंवार त्रासाला कंटाळून पुतण्याने झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निखिल अजय मिंडे (वय २८) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवार दिनांक २२ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी चुलता संजय नारायण मिंडे व त्याची पत्नी कुंदा मिंडे यांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे.

  • 24 Apr 2025 02:08 PM (IST)

    24 Apr 2025 02:08 PM (IST)

    पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथून नऊ बांगलादेशींना अटक

    पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथून नऊ बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. सिलिगुडी मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या आशिघर चौकीच्या पोलिसांनी शहरातील फकादाईबारी भागातून बांगलादेशींना अटक केली आहे. अटक केलेल्या बांगलादेशींमध्ये दोघे अल्पवयीन आहेत. याशिवाय, बांगलादेशींना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली घराच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे. जतिन चंद्र रॉय (56), बाऊल राणी (54), बाळू चंद्र रॉय (40), गुलाबी राणी (30), झरना राणी (34), संजीव रॉय (19) आणि निर्मल मजुमदार (60) अशी अटक केलेल्या बांगलादेशींची नावे आहेत.

  • 24 Apr 2025 12:21 PM (IST)

    24 Apr 2025 12:21 PM (IST)

    तंबाखू न दिल्याने तरुणाला आला राग, वादावादी झाली अन् नंतर रागातून हत्या झाली

    फोनवर मोठ्याने बोलण्याचा आणि चापट मारल्याचा राग मनात धरुन एका सुताराने त्याच्या सहकाऱ्याची हत्या केली. या सुताराने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली ढकलून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये सहकाऱ्याचा मृत्यू झाला असून, कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी अफसर जमीर उद्दीन आलम (वय 25) याला अटक केली आहे. कांदिवली पश्चिमेकडील भाटिया स्कूलसमोर असलेल्या दैवी इंटरनीटी पी 2 या ठिकाणी 20 एप्रिल रोजी ही घटना घडली.

  • 24 Apr 2025 11:35 AM (IST)

    24 Apr 2025 11:35 AM (IST)

    टँकरची दुचाकीला जोरदार धडक

    टँकरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात डाॅक्टर तरुणाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पसार झालेल्या टँकरचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. हडपसर भागात साेमवारी ही घटना घडली होती. सीसीटीव्ही व तांत्रिक तपासवरून मार्ग काढत पसार झालेल्या टँकरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेंद्र एकनाथ तळेकर (वय ५१, रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. डाॅ. ईश्वर साहू (वय २९, रा. सातववाडी, हडपसर) असे मृत्यु झालेल्याचे नाव आहे.

  • 24 Apr 2025 11:34 AM (IST)

    24 Apr 2025 11:34 AM (IST)

    Accident News : टँकरची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात डाॅक्टर तरुणाचा मृत्यू

    पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टँकरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात डाॅक्टर तरुणाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पसार झालेल्या टँकरचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. हडपसर भागात साेमवारी ही घटना घडली होती. सीसीटीव्ही व तांत्रिक तपासवरून मार्ग काढत पसार झालेल्या टँकरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेंद्र एकनाथ तळेकर (वय ५१, रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. डाॅ. ईश्वर साहू (वय २९, रा. सातववाडी, हडपसर) असे मृत्यु झालेल्याचे नाव आहे.

  • 24 Apr 2025 11:34 AM (IST)

    24 Apr 2025 11:34 AM (IST)

    अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

    पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तरुणाला हडपसर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. तांत्रिक तपास करुन पोलिस आरो

  • 24 Apr 2025 11:30 AM (IST)

    24 Apr 2025 11:30 AM (IST)

    गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

    भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गंभीरला ही धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली असून या ईमेलमध्ये फक्त तीन शब्द लिहिले होते, I Kill You..., नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊया...

    गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी, ISIS काश्मीरने ईमेलद्वारे पाठवली धमकी

     

  • 24 Apr 2025 11:19 AM (IST)

    24 Apr 2025 11:19 AM (IST)

    १९९९ मध्ये हत्या केल्यांनतर फरार असलेला आरोपीला बेड्या, २६ वर्षांनंतर पोलिसांना लागला सुगावा उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष कार्यब

    उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कार्यबल (एसटीएफ) ने महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यात एक २६ वर्षीय पहिले करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणात हवा असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा हत्या केल्यानंतर २६ वर्षांपासून लपत होता. मंगळवारी रात्री एका निवेदनात, एसटीएफने म्हटले आहे की अटक केलेल्या आरोपीचे नाव विनोद कुमार असे आहे, जो सिद्धार्थनगर जिल्ह्यातील भवानीगंज पोलिस स्टेशन हद्दीतील परसाहेतीम गावचा रहिवासी आहे.  तो ठाणे जिल्ह्यात हत्या करून दिल्लीला फरार झाला होता. 26 वर्ष तो आपल्या नातेवाईकांकडे राहत होता. सविस्तर बातमी..

    १९९९ मध्ये हत्या केल्यांनतर फरार असलेला आरोपीला बेड्या, २६ वर्षांनंतर पोलिसांना लागला सुगावा उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष कार्यब

Web Title: Crime news live updates in marathi first he teased the girl then he kept her in the elevator for half an hour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 10:03 AM

Topics:  

  • crime
  • police
  • pune crime news
  • pune news

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक
1

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी
2

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर
3

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
4

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.