Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Murder Pune: “पाणी भरण्याचा किरकोळ वाद ठरला जीवघेणा!” पुण्याच्या बालेवाडीत १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून…

Murder Pune: सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या किरकोळ वादातून पुण्यात उडाला रक्ताचा थारोळा! धडा शिकवायला गेलेल्या तरुणाचा चाकूच्या वारामुळे दुर्दैवी अंत... बालेवाडीतील या थरारक घटनेने हादरले शहर!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 16, 2026 | 03:40 PM
Murder Pune: "पाणी भरण्याचा किरकोळ वाद ठरला जीवघेणा!" पुण्याच्या बालेवाडीत १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून...

Murder Pune: "पाणी भरण्याचा किरकोळ वाद ठरला जीवघेणा!" पुण्याच्या बालेवाडीत १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून...

Follow Us
Follow Us:
  • पाणी भरण्याच्या वादातून १९ वर्षीय करण कापरेची चाकूने हत्या
  • आरोपीच्या घरी वाद झाल्यावर त्याने चाकूने हल्ला केल्याने करणचा उपचारादरम्यान मृत्यू
  • बाणेर पोलिसांनी मुख्य आरोपी प्रतीक मानकर याला अटक 
Murder Pune: पुण्यातील बालेवाडी परिसरातून एक अत्यंत खळबळजनक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचा अत्यंत भयंकर आणि रक्तरंजित शेवट झाला. या संघर्षात अवघ्या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

हेही वाचा: Family Assault: “अश्लील मेसेजचा जाब विचारला म्हणून पोलिसाच्या कुटुंबावर हल्ला!”परप्रांतीय तरुणांच्या या मुजोरीमुळे उडाली खळबळ

काय आहे नेमके प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, बालेवाडीतील पाटील वस्तीतील पत्राचाळीत हा खूनी थरार घडला. मृत तरुण करण कापरे (वय १९, रा. पाटील वस्ती, बालेवाडी) आणि आरोपी प्रतीक मानकर (वय १९, रा. पाटील वस्ती, बालेवाडी) हे दोघेही एकाच परिसरात राहून छोटी-मोठी कामे करत आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र, सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून त्यांच्यात बऱ्याच काळापासून वाद सुरू होते. प्रतीकच्या वागणुकीमुळे आपल्याला आणि इतर शेजाऱ्यांना पुरेसे पाणी भरता येत नाही, अशी करण आणि त्याच्या मित्रांची तक्रार होती. यावरून त्यांच्यात यापूर्वीही अनेकदा खटके उडाले होते.

धडा शिकवायला गेले अन् रक्ताचा थारोळा सांडला

शनिवारी रात्री हाच पाणी भरण्याचा वाद पुन्हा एकदा भडकला. प्रतीकाला चांगलाच धडा शिकवायचा, या उद्देशाने करण आणि त्याचे तीन मित्र असे चौघे जण थेट प्रतीकच्या घरी गेले. चौघेही भांडण्याच्या उद्देशाने घरी आल्याचे लक्षात येताच प्रतीकने तातडीने घरात धाव घेतली. त्याने घरातून एक धारदार चाकू आणला आणि चौघांशी वाद घालण्यास सुरुवात केली.

वाद विकोपाला जाताच प्रतीकने हातातील चाकू चौघांवर सपासप फिरवला. या भीषण हल्ल्यात चौघेही तरुण गंभीर जखमी झाले. विशेषतः करणच्या पोटात चाकूचा अत्यंत खोलवर वार बसल्याने रक्ताचा थारोळा सांडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा: Student Kidnapping: पिंपरी-चिंचवड हादरले! महाविद्यालयीन तरुणाचे दिवसाढवळ्या भररस्त्यात अपहरण अन् चौकात नेऊन…

बाणेर पोलिसांची धडक कारवाई 

या थरारक घटनेची माहिती मिळताच बाणेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुख्य आरोपी प्रतीक मानकर याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत. पाण्याची टंचाई आणि किरकोळ वादातून एका तरुणाचा अशाप्रकारे अंत झाल्याने बालेवाडी परिसरात मोठी दहशत आणि हळहळ व्यक्त होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही हत्येची घटना पुण्यातील कोणत्या भागात घडली?

    Ans: पुण्यातील बालेवाडी परिसरातील पाटील वस्तीतील पत्राचाळीत ही घटना घडली.

  • Que: हा रक्तरंजित संघर्ष नेमक्या कोणत्या कारणावरून झाला?

    Ans: सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून असलेल्या जुन्या वादातून हा संघर्ष झाला.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणी कोणती कारवाई केली आहे?

    Ans: बाणेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी प्रतीक मानकर (वय १९) याला अटक केली आहे.

Web Title: Pune balewadi water dispute 19 year old youth murder case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • maharashtra. pune crime
  • pune crime news
  • pune murder news

संबंधित बातम्या

Family Assault: “अश्लील मेसेजचा जाब विचारला म्हणून पोलिसाच्या कुटुंबावर हल्ला!”परप्रांतीय तरुणांच्या या मुजोरीमुळे उडाली खळबळ
1

Family Assault: “अश्लील मेसेजचा जाब विचारला म्हणून पोलिसाच्या कुटुंबावर हल्ला!”परप्रांतीय तरुणांच्या या मुजोरीमुळे उडाली खळबळ

Newborn Baby: “रात्रीच्या अंधारात ओढ्यातून आला रडण्याचा आवाज…” त्या अमानुष प्रकाराने…
2

Newborn Baby: “रात्रीच्या अंधारात ओढ्यातून आला रडण्याचा आवाज…” त्या अमानुष प्रकाराने…

Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा…
3

Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा…

Nagpur: “प्रेमप्रकरणाचा जाब विचारल्याने संपवले!” नागपुरात सराईत गुंडाचा खूनी थरार; अल्पवयीन प्रेयसीच्या मामीचे अपहरण करून..
4

Nagpur: “प्रेमप्रकरणाचा जाब विचारल्याने संपवले!” नागपुरात सराईत गुंडाचा खूनी थरार; अल्पवयीन प्रेयसीच्या मामीचे अपहरण करून..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.