फोटो सौजन्य सोशल मिडिया
Hingoli Crime : हिंगोली जिल्ह्यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) चे रिटेल सेल्स मॅनेजर महेश शेळके यांची पेट्रोल पंपावर हत्या करण्यात आली आहे. धारदार शस्त्राने वार करून अत्यंत निर्घृण पणे ही हत्या करण्यात आली. अधिकृत कर्तव्य बजावत असताना झालेल्या या भयंकर हत्येची केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी गंभीर दखल घेतली असून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.आरोपींवर लवकरात लवकर कायदेशीर योग्य ती कठोर कारवाई व्हावी अशी महाराष्ट्र सरकार कडे मागणी केली आहे.
मंगळवार ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील चोंढी फाटा येथील ‘साई उमेश’ पेट्रोल पंपावर ही घटना घडली होती.
इंडियन आॅइल कंपनीचे अधिकारी आणि पांडववीर यांच्या पेट्रोलपंपाविषयी चर्चा होती. आम्हाला अजून एक महिन्याची मुदत हवी; त्यानंतर पंप सुरू करू अशी मागणी पांडववीर कुटुंबीयांनी केली. पण कंपनीचे अधिकारी पंप सील करून ताबा घेण्याच्या निर्णयावर ठाम होते. या बाचाबाचीत वाद वाढला. तेथे उपस्थित उमेश पांडववीर याने कंपनीचे विक्री विभागाचे व्यवस्थापक महेश शेळके यांच्यावर अचानक खंजरने वार केला. या हत्येनंतर उमेश पांडववीर पळ काढला असून; पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Crime News: ओळखीच्या व्यक्तीची घरात एन्ट्री अन् काही वेळातच हत्येचा थरार; पैशांचा वाद ठरला कारणीभूत
इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी महेश शेळके त्यांच्या पथकासह अनियमिततेमुळे हा पेट्रोल पंप सील करून त्याचा ताबा घेण्यासाठी गेले होते. यावेळी पेट्रोल पंप मालक उमेश पांडववीर आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत त्यांची जोरदार बाचाबाची झाली. पेट्रोल पंप मालक उमेश पांडववीर यांनी महेश शेळके यांच्यावर खंजरने 07 वार करून हल्ला केला, यामध्ये महेश शेळके गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह वस्मत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून पोलिस ओरापीचा शोधघेत आहेत.
हा वाद विकोपाला गेला असून आरोपींनी महेश शेळके यांच्यावर खंजिराने तब्बल ७ हून अधिक वार केले आहेत. महेश शेळके गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना, मारहाण आणि हत्येची घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. हा एकमेव पुरावा पोलिसांसाठी उपयुक्त ठरू शकतो.
‘भूत काढण्याच्या’ बहाण्याने अघोरी विधी; फलटणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप






