ठगांनी लुटले ३६,००० कोटी, डिजिटल पेमेंट, सरकारी बँकांना फटका
पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम असून, सायबर चोरट्यांनी दोन घटनांत दोघांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केली. खराडी भागातील तरुणाची ३६ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत ३२ वर्षीय तरुणाने खराडी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. चोरट्यांनी तरुणाला एका ग्रुपमध्ये अॅड केले. तिथे गुंतवणूकीची माहिती दिली. तरुणाचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याला ३६ लाख ५५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत. हडपसर भागातील तरुणाचीही अशाच प्रकारे ८ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने वानवडी पोलिसांत तक्रार दिली.
क्रेडिट कार्ड अपडेट करण्याची बतावणी
क्रेडिट कार्ड अपडेट करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी तरुणाची ३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत २७ वर्षीय तरुणाने वाघोली पोलिसांत तक्रार दिली आहे. तरुण खासगी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतो. चोरट्यांनी तरुणाला संपर्क साधला. बँकेकडून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची माहिती गोळा केली जात आहे. तसेच, त्यांचे क्रेडिट कार्ड अपडेट केले जात असल्याचे सांगितले. त्यानूसार तरुणाकडून बँक खात्याची गोपनीय माहिती व क्रेडिट कार्डचा पासर्वड मिळवला. तसेच, त्याच्या खात्यातून ३ लाख ८० हजार रुपये स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केले. वरिष्ठ निरीक्षक पंडित रेजितवाड तपास करत आहेत.
सायबर चोरट्यांकडून नवीन युक्त्यांचा वापर; दररोज तब्बल ‘इतक्या’ जणांना गंडा
आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक
आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची साडेपाच लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. याबाबत ३३ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. आभासी चलनात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. नंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ५ लाख ५५ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा केले. सुरुवातीला चोरट्यांनी महिलेला परतावा दिला. नंतर परतावा देणे बंद केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.
सायबर चोरट्यांकडून नवीन युक्त्यांचा वापर
सायबर फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी रेडिओ, फोन, सोशल मीडिया आणि टेलिव्हिजन चॅनेलवर रात्रंदिवस प्रचार केला जात असला तरी, देशात सायबर फसवणुकीचे प्रकार थांबत नाहीत. अलिकडेच अर्थ मंत्रालयाने राज्यसभेत सादर केलेल्या सायबर फसवणुकीच्या आकडेवारीनुसार गेल्या १० महिन्यात म्हणजे एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंत फसवणुकीच्या २४ लाख घटना नोंदविल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये फसवणूक करणाऱ्यांनी लोकांकडून ४२४५ कोटी रूपये लुटले आहेत.