Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्…; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक

हिंजवडी फेज–२ मधील गेरा इमारतीत ‘टेकला सोल्युशन’ आणि ‘स्काय सोल्युशन’ ही दोन कॉल सेंटर अनधिकृतपणे सुरू होती. छाप्यात २० हार्ड डिस्क आणि तीन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 16, 2025 | 02:35 AM
Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्...; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक

Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्...; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक

Follow Us
Close
Follow Us:
अनधिकृत कॉल सेंटरवर अमेरिकन नागरिकांची फसवणूक
पोलिसांनी जप्त केले २० हार्डडिस्क व ३ लॅपटॉप 
सायबर पोलिसांनी केली 4 जणांना अटक

पिंपरी: अमेरिकेतील नागरिकांना लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर फसवणूक करणाऱ्या दोन अनधिकृत कॉल सेंटरचा पर्दाफाश सायबर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट–२ने केला आहे. आरोपी अमेरिकन नागरिकांचे क्रेडिट स्कोर सुधारून देण्याच्या नावाखाली माहिती मिळवत आणि त्याद्वारे आर्थिक गैरव्यवहार करीत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अनधिकृत केंद्रांवर छापा; महत्त्वाची उपकरणे जप्त
हिंजवडी फेज–२ मधील गेरा इमारतीत ‘टेकला सोल्युशन’ आणि ‘स्काय सोल्युशन’ ही दोन कॉल सेंटर अनधिकृतपणे सुरू होती. छाप्यात २० हार्ड डिस्क आणि तीन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वैयक्तिक डेटा आढळून आला. या डेटाचा वापर करून कर्मचारी थेट अमेरिकेतील नागरिकांशी संवाद साधत आणि तयार केलेल्या स्क्रिप्टनुसार त्यांना फसवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Online Digital Life Certificate : जीवन प्रमाणपत्र सादर करताना घ्या काळजी..; नाहीतर सायबर चोरांकडून होऊ शकते आर्थिक फसवणूक

क्रेडिट स्कोर सुधारून देण्याचे आमिष
आरोपी ‘कम्युनिटी चॉईस फायनान्शिअल कंपनी’च्या नावाने कॉल करत. नावेव्हा क्रेडिट स्कोर सुधारून लोन मिळवून देऊ, असे सांगून अमेरिकन नागरिकांना जाळ्यात ओढले जात होते. त्यानंतर त्यांच्याकडून विविध कंपन्यांची कुपन मागवून ती डॉलरमध्ये बदलण्याची फसवणूक केली जात होती.
मेडिकल दाव्यांच्या नावाखालीही फसवणूक
दुसऱ्या पद्धतीत आरोपी स्वतःला अमेरिकेतील मेडिकल हेल्थ डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगत. राउंड अप, टाल्कम पावडर, झॅनटॅक यांसारख्या औषधांमुळे काहींना कर्करोग झाला असल्याचे सांगून, त्यांच्या वतीने कोर्टात दावा दाखल करून मोठी नुकसानभरपाई मिळवून देऊ असे आमिष दाखवले जात होते. त्यासाठी नागरिकांकडून सविस्तर वैयक्तिक माहिती घेतली जात आणि ती त्रयस्थ संस्थांना विकून आर्थिक फायदा मिळवला जात होता.

Nagpur : नफ्याचे आमिष दाखवून 61 वर्षीय नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक

पोलीसांची तत्पर कारवाई
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण नाळे आणि गुन्हे शाखा युनिट–२ चे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने छापा टाकून दोन्ही कॉल सेंटरमधील कृत्यांना आळा घातला. या प्रकरणी टेकला सोल्युशनचे मालक धनंजय साहेबराव कासार, मॅनेजर हर्षद शंकर खामकर तसेच स्काय सोल्युशनचे मालक सागर कुमार यादव आणि मॅनेजर आनंद पंकज सिन्हा यांना अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्यांचा वाढता चेहरा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील फसवणुकीचे हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे मानले जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Cyber police 4 arrest gave loan to foreigner people pimpri crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Pimpri

संबंधित बातम्या

Crime News: लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मारहाण; दोघांना अटक 
1

Crime News: लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मारहाण; दोघांना अटक 

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना ठोकल्या बेड्या; आरोपींबाबत धक्कादायक माहिती समोर
2

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना ठोकल्या बेड्या; आरोपींबाबत धक्कादायक माहिती समोर

हिंजवडीत पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; नागरिकांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश
3

हिंजवडीत पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; नागरिकांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

सवलतीच्या आमिषाने शेकडो नागरिकांना लाखोंचा गंडा; संतप्त नागरिकांनी अखेर दुकानाचे कुलूपच तोडले अन्…
4

सवलतीच्या आमिषाने शेकडो नागरिकांना लाखोंचा गंडा; संतप्त नागरिकांनी अखेर दुकानाचे कुलूपच तोडले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.