Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड; दौंड उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल…

राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभागाने अवैध मद्यविक्री आणि वाहतुकी विरोधात धडक कारवाई करत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उधळून लावली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 04, 2026 | 03:14 PM
गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड; दौंड उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल...

गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड; दौंड उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल...

Follow Us
Follow Us:

पाटस : राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभागाने अवैध मद्यविक्री आणि वाहतुकी विरोधात धडक कारवाई करत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उधळून लावली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, मद्यसाठा, चारचाकी वाहन आणि मोबाईलसह सुमारे 6 लाख 98 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाटस- दौंड अष्टविनायक रोडवरील बेटवाडी हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.

 

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक प्रविण सोनवणे यांनी ही माहिती दिली. उत्पादन शुल्क विभागाचे पथक 31 मे रोजी दौंड परिसरात अवैध मद्यविरोधी गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पाटस – दौंड रस्त्यावर बेटवाडी गावच्या हद्दीत माय ऊर्जा कंपनी आउटलेटसमोर सापळा रचण्यात आला. पाटसकडून दौंडकडे येणारी मारुती सुझुकी स्विफ्ट (क्रमांक MH-12-KE-9799 ) ही गाडी थांबवून तपासणी केली असता या गाडीत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला.

तसेच गाडीचालक शुभम उत्तम रुपनवर ( रा. दापोडी, ता. दौंड जि. पुणे ) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून आरोपीच्या दापोडी येथील राहत्या घरासमोरील खोलीवर छापा टाकण्यात आला. तेथेही मोठ्या प्रमाणावर अवैध विदेशी मद्याचा साठा आढळला.

यावेळी पोलीसांनी विविध कंपनीच्या एकूण 816 सीलबंद बाटल्या तसेच या गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार , एक मोबाईल फोन असा एकूण किंमत 6 लाख 98 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडे मद्य बाळगण्यासाठी किंवा वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलम 65(अ) व 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : कांद्याबाबत केंद्र, राज्य सरकार सकारात्मक; वळसे पाटलांनी आंदोलकांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, मयुर गाडे, ठाकूर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुवास पोळ तसेच जवान संकेत वाजे, सोपान टोंपे, साळुंके, देवकर आणि वामने यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास दुय्यम निरीक्षक मयुर विजय गाडे करीत आहेत. दरम्यान, परराज्यातून अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची अशी धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Daund excise department seizes stock of illegal foreign liquor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.