Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! शिरूरच्या कारेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; घरात नेले अन्…

शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व अप्राकृतिक कृत्य करण्याचा प्रयत्न झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 21, 2026 | 12:30 AM
संतापजनक! शिरूरच्या कारेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; घरात नेले अन्...

संतापजनक! शिरूरच्या कारेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; घरात नेले अन्...

Follow Us
Follow Us:
  • कारेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
  • ६५ वर्षीय आरोपीला ठोकल्या बेड्या
  • रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व अप्राकृतिक कृत्य करण्याचा प्रयत्न झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. रोहिदास दत्तात्रय वाकचौरे (वय ६५ वर्षे, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. वासुंदे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी घराशेजारी खेळण्यासाठी गेली होती. खेळून झाल्यानंतर ती आपल्या घरी परतत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या आरोपी रोहिदास वाकचौरे याने तिला आवाज देऊन बोलावून घेतले. त्यानंतर तिला फूस लावून स्वतःच्या घरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार तसेच अप्राकृतिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा : स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ४८ तासांनंतर संशयित कर्नाटकातून ताब्यात

नातेवाइकांची पोलिसांत धाव

घटनेनंतर पीडित मुलीने घरी येऊन घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी तत्काळ रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी रोहिदास वाकचौरे याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अॅट्रॉसिटी) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक केली. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक गुन्ह्यांचे प्रकरण असल्याने पोलीस सर्व कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करत फॉरेन्सिक व इतर पुरावे गोळा करत आहेत. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा प्रकार कुठे घडला?

    Ans: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

  • Que: या प्रकरणातील आरोपीचे नाव काय आहे आणि त्याचे वय किती आहे?

    Ans: रोहिदास दत्तात्रय वाकचौरे (वय ६५ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

  • Que: या प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Web Title: An incident involving the molestation of a minor girl has taken place in karegaon shirur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Shikrapur

संबंधित बातम्या

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?
1

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?

स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ४८ तासांनंतर संशयित कर्नाटकातून ताब्यात
2

स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ४८ तासांनंतर संशयित कर्नाटकातून ताब्यात

मित्राच्या भांडणात मध्यस्थी भोवली, एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
3

मित्राच्या भांडणात मध्यस्थी भोवली, एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

डिस्काउंट न दिल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखले; मोशीत खळबळ
4

डिस्काउंट न दिल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखले; मोशीत खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.