Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Daund Crime : अपघाताचा बनाव रचून साडे 6 लाखांचे खोबरे लंपास; दौंड पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

खोबऱ्याच्या मालाच्या अपहार प्रकरणाचा दौंड पोलिसांनी यशस्वी छडा लावला असून, या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यातील ६ लाख ६८ हजार ७७५ रुपये किमतीचे ३६१५ किलो खोबरे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 26, 2026 | 05:39 PM
अपघाताचा बनाव रचून साडे 6 लाखांचे खोबरे लंपास; दौंड पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

अपघाताचा बनाव रचून साडे 6 लाखांचे खोबरे लंपास; दौंड पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

दौंड : राज्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. खोबऱ्याच्या मालाच्या अपहार प्रकरणाचा दौंड पोलिसांनी यशस्वी छडा लावला असून, या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यातील ६ लाख ६८ हजार ७७५ रुपये किमतीचे ३६१५ किलो खोबरे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १७ मे २०२६ रोजी फिर्यादी भरत मारुल सिद्धाप्पा (रा. चिंकमंगळूर, कर्नाटक) यांनी त्यांचा आयशर टेम्पो (एमएच ४७ एएस ५३६८) मधून ३६१५ किलो खोबरे चिंकमंगळूर येथील ट्रेडिंग कंपनीमधून पुण्यातील गुलटेकडी येथे विक्रीसाठी पाठविले होते. हे वाहन चालक मनोज आंध्रेश बनसोडे (रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याच्या ताब्यात देण्यात आले होते. दरम्यान, दिनांक १९ मे रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चालक मनोज बनसोडे याने फिर्यादीला फोन करून कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीत सोलापूर–पुणे महामार्गावरील हॉटेलसमोर वाहनाचा अपघात होऊन टेम्पो पलटी झाल्याचे तसेच त्यातील खोबरे अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्राथमिक चौकशीत प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान चालक मनोज बनसोडे याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने साथीदार सुनील दत्तात्रेय लावरे, अनिकेत रावसाहेब पवार आणि तुषार लक्ष्मण जगताप (सर्व रा. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांच्या संगनमताने टेम्पोतील खोबरे दुसऱ्या वाहनात भरून अपहार केल्याची कबुली दिली. तसेच चोरीचा प्रकार लपविण्यासाठी अपघाताचा बनाव रचल्याचेही निष्पन्न झाले.

हे सुद्धा वाचा : छत्रपती संभाजीनगर हादरलं! शिवसेनेच्या नेत्यावर चाकूने हल्ला; भेटायला बोलावलं अन्…

याप्रकरणी फिर्यादी भरत मारुल सिद्धाप्पा यांच्या तक्रारीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस उपनिरीक्षक बिद्री, पोलीस हवालदार नितीन बोराडे, सुभाष राऊत, धनाजी गाढवे, अंतुल पठाण, अमीर शेख, निखिल जाधव, किरण पांढरे, संजय कोठावळे, गोरख हजारे, सोमनाथ चौंडे, पवन माने व महादेव जाधव यांनी ही कारवाई केली.

Web Title: Daund police have arrested the accused of stealing coconuts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Daund Police

संबंधित बातम्या

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या
1

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
3

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.