मालेगाव : सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू (Assistant Superintendent of Police Tegbir Singh Sandhu) यांच्यासह विशेष पथक, आझाद नगर पोलीस (Azad Nagar Police) व वनविभागाचे अधिकारी (Forest Department) व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे शहरातील गुलशनाबाद परिसरात छापा (Raids) टाकला. यावेळी १५ किलो हरणाचे (Deer) मांस (Meat), हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी शरजील अंजुम अहमद (वय ३०, रा. मेनरोड, गुलशनाबाद) याला वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन आणि संरक्षित प्राण्यांची शिकार केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली.
गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. संधू यांना शहरात शिकार करताना मांस आणल्याची माहिती मिळाली. संधू, आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली महाजन, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.जाविद खाटीक, वनपरिमंडळ अधिकारी अतुल देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक, आझाद नगर पोलीस आदींनी या वृत्ताला दुजोरा मिळताच घटनास्थळी धाव घेतली. शर्जीलकडून अंजुमच्या घराजवळ छापा टाकला.
[read_also content=”ऑस्ट्रेलियाहून परतलेल्या प्रवाशाकडे सापडले ३३.७१ लाख रुपयांचे सोने, विमानतळावर केलं जप्त, संशयास्पद हालचालीवरून बळावला संशय https://www.navarashtra.com/crime/crime-gold-worth-rs-33-71-lakh-found-with-a-passenger-returning-from-australia-seized-at-the-amritsar-international-airport-nrvb-361549.html”]
यावेळी हरणाचे मांस जप्त करण्यात आले. डॉ.खाटीक यांनी घटनास्थळावरून मांस जप्त केल्यानंतर मांस व इतर वस्तूंची तपासणी करण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी हरणाचे चारही पाय यासह डोके, कान, कातडे आढळून आले असून, पाहणी केली असता शिकार केलेले हरण चिंकारा प्रजातीचे असल्याची माहिती डॉ. खाटिक यांनी दिली. पोलीस आता कुठे आणि कशी शिकार केली? हे तपासत आहेत. रात्री उशिरा शरजील अंजुमविरुद्ध आझाद नगर पोलिस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
[read_also content=”धक्कादायक! मेल्यानंतरही तुम्ही देणं लागता, मुडद्यांनाही द्यावे लागते भाडे, भाडे भरण्यास उशीर झाल्यास मृतदेहाची रवानगी थेट कबरीबाहेरच https://www.navarashtra.com/viral/shocking-even-the-dead-have-to-pay-rent-if-there-is-delay-in-paying-the-rent-then-the-dead-body-is-out-of-the-grave-viral-news-nrvb-361527.html”]