दिल्लीतील बवाना (Bawana, Delhi) येथील हॉटेलमध्ये (Hotel) एक मुलगी आणि मुलाचा मृतदेह (Girl And Boy Dead Body) सापडले आहेत. हॉटेल मालकाने सांगितले की दोघेही २१ वर्षांचे आहेत आणि दोघांनी सकाळी १० वाजता हॉटेलमध्ये चेक इन (Check In) केले होते. मुलीच्या मानेवर कापलेल्या खुणा तर मुलाच्या तोंडातून फेस येत होता. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये २१ वर्षीय मुलगा आणि २१ वर्षीय मुलीचे मृतदेह सापडले आहेत. मुलीच्या मानेवर कापलेल्या खुणा तर मुलाच्या तोंडातून फेस येत होता. हे हॉटेल बवाना परिसरात आहे. दिल्ली पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर खोली सील केली असून दोन्ही मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे.
[read_also content=”यवतमाळ जिल्ह्यात अवघ्या ९ दिवसांत झाल्यात ६ हत्या, लल्या हत्याकांडात ५ आरोपी अटकेत, २ अजूनही आहेत फरार https://www.navarashtra.com/crime/lallya-murder-case-6-murders-in-just-9-days-in-yavatmal-district-crime-5-accused-arrested-2-still-absconding-nrvb-361079.html”]
सुरुवातीच्या तपासाच्या आधारे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, हे हत्यानंतर आत्महत्येचे प्रकरण आहे. उत्तर बाह्य दिल्लीचे डीसीपी देवेश महाला यांच्या म्हणण्यानुसार, १० जानेवारीच्या मंगळवारी रात्री एका हॉटेल मालकाने पोलिसांशी संपर्क साधला आणि सांगितले की त्याच्या हॉटेलच्या एका खोलीत दोन मृतदेह पडले आहेत.
हॉटेल मालकाने सांगितले की दोघेही २१ वर्षांचे आहेत आणि दोघांनी सकाळी १० वाजता हॉटेलमध्ये चेक इन केले होते. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना मुलीच्या मानेवर जखमेच्या खुणा आढळून आल्या, तर मुलाच्या तोंडातून फेस येत होता, जो वाढला होता. याशिवाय खोली आणि बाथरूममध्येही उलट्या झाल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले.
[read_also content=”अरे देवा! अन् राखीची झाली फातिमा, ज्याच्यावर एवढं जिवापाड प्रेम केलं शेवटी त्याच पतीने दिला धोका… कारण जाणून तुम्हालाही बसेल शॉक https://www.navarashtra.com/viral/rakhi-sawant-got-married-second-time-became-a-victim-of-love-jihad-he-himself-made-this-shocking-disclosure-nrvb-361059.html”]
पोलिसांनी खोलीतून सल्फा पावडर आणि रक्ताने माखलेला चाकूही जप्त केला आहे. यानंतर एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात पोलिसांना वाटते की, मुलीची हत्या केल्यानंतर मुलाने आत्महत्या केली आहे. या दोघांशिवाय सीसीटीव्हीमध्ये कोणीही खोलीत येताना किंवा जाताना दिसले नाही.
पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दोघांची ओळख अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही.