Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: लग्नाच्या अवघ्या अडीच महिन्यांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा हत्येचा आरोप

दिल्लीतील लोधी कॉलनी परिसरात 28 वर्षीय नवविवाहित आकृती सुतार हिचा इमारतीवरून पडून संशयास्पद मृत्यू झाला. लग्नाला तीन महिनेही पूर्ण झाले नसताना घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप केला असून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 06, 2026 | 11:29 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील लोधी कॉलनीत 28 वर्षीय नवविवाहित आकृती सुतार हिचा संशयास्पद मृत्यू झाला.
  • माहेरच्या कुटुंबीयांनी हा अपघात किंवा आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे.
  • पोलिसांनी BNSS अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून शवविच्छेदन अहवाल व पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.
दिल्ली : नवी दिल्ली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २८ वर्षीय नवविवाहितेचा इमारतीच्या छतावरून पडून संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आकृती सुतार असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपथित केले जात आहेत. लग्नाला तीन महिनेही पूर्ण झाले नव्हते आणि ही घटना घडली. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. माहेरच्या लोकांनी हा अपघात किंवा आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत सासरच्या मंडळींवर हत्येचा थेट आरोप केला आहे.

काय नेमकं प्रकरण?

मृत्यू झालेल्या २८ वर्षीय नवविवाहितेचे नाव आकृती असे आहे. ४ जुलै रोजी शनिवारी उशिरा संध्याकाळी लोधी कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीतून एक महिला पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या आकृतीला एम्स (AIIMS) ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले, मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी महिलेची ओळख तिचे नाव आकृती असे समोर आले. आकृती दिल्लीतील छतरपूर भागात एका खाजगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत होती.

Satara Accident: ताथवडे घाटात दरड कोसळून कारचा चक्काचूर; बारामतीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

कुटुंबीयांनी काय सांगितले?

घटनेच्या दिवशीही ती नेहमीप्रमाणे कामावर गेली होती आणि संध्याकाळी तिचे तिच्या कुटुंबीयांशी फोनवर बोलणेही झाले होते.फोनवर बोलताना आकृतीने ती ऑफिसमधून निघाली असून घराकडे जात असल्याचे सांगितले होते, मात्र काही वेळातच तिचा फोन नॉट रीचेबल येऊ लागला. संपर्क होत नसल्याने काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. याच दरम्यान त्यांना लोधी कॉलनी पोलिसांकडून आकृतीचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक माहिती मिळाली.

आकृतीच्या माहेरच्यांनी केला गंभीर आरोप

रुग्णालयात पोहोचल्यानंतर आकृतीच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर गंभीर आरोप केले. आकृती मानसिकदृष्ट्या अत्यंत खंबीर होती आणि ती आत्महत्येसारखे पाऊल कधीच उचलू शकत नाही, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी तिच्या वडिलांनी व नातेवाईकांनी केली आहे.

पोलीस तपास सुरु

आकृतीचा विवाह पुष्प विहार येथील सरकारी निवासस्थानात राहणाऱ्या कामगार विभागातील एका सेक्शन ऑफिसरच्या मुलाशी झाला होता. २४ एप्रिलला आकृतीचे लग्न सेक्शन ऑफिसरशी झाले होते. लग्नाला तीन महिनेही झाले नव्हते मग असं काय घडलं की थेट आकृतीचा संशयास्पद मृतदेह आदळला. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम 196 अनुसार कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि इतर तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही शक्यता नाकारता येणार नाहीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

West Bengal Crime: १२ वर्षीय मुलीचा अपहरण, बलात्कार करून हत्या; त्यानंतर मृतदेह तलावात फेकला

💡

Frequently Asked Questions

  • Que: आकृती सुतारचा मृत्यू कसा झाला?

    Ans: आकृती सुतार हिचा दिल्लीतील लोधी कॉलनी परिसरात इमारतीवरून पडून संशयास्पद मृत्यू झाला.

  • Que: कुटुंबीयांनी कोणता आरोप केला आहे?

    Ans: माहेरच्या कुटुंबीयांनी हा आत्महत्या किंवा अपघात नसून सासरच्या मंडळींनी घातपात केल्याचा आरोप केला आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांची भूमिका काय आहे?

    Ans: पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असून शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Delhi crime newlywed woman dies under suspicious circumstances just two and a half months after marriage family alleges murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
1

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
2

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
3

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
4

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.