काय घडलं नेमकं?
मृत्यू झालेल्या तरुणाचा नाव योगेश पोपट जगताप (रा. आंबे खुर्द, ता. बारामती) समोर आली आहे. फलटण-पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात अचानक दरड कोसळून एका चारचाकी वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात योगेश पोपट जगताप याचा मृत्यू झाला. या घटनेनं घाट परिसरात प्रवास करताना चिंतेची बाब निर्माण झाली आहे.
Nashik Crime: दुचाकीला कट लागला अन् कारचालकाने पोटात खुपसला चाकू; CCTV मध्ये थरार कैद
शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव
सातारा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेळीचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या नातवाला आणि नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजीचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना माण तालुक्यातील मार्डी गावातील काळेवस्ती परिसरात घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे.
मृत्यू झालेल्या वृक्ष महिलेचं नाव मालन विलास काळे (वय 60) अशी आहे. तर नातू सुजित युवराज काळे (वय 13) अशी आहे. हे दोघेही शेळ्या चारण्यासाठी बेंदी शिवारात गेल्या होत्या. तेव्हा एका शेळीचा पाय वीजेच्या तारेत अडकून पडला होता. विद्युत प्रवास सुरू असताना शेळीला जोरदार शॉक बसून ती तडफडू लागली होती. हे बघून सुजित तिला वाचवण्यासाठी पुढे गेला. मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला. तो विजेच्या तारेला चिकटून तडफडू लागला होता.
आजीच्या डोळ्यासमोर नातू मरणाशी झुंज देत होता. हे पाहून आजी मालन यांनी कोणताही विचार न करता, वाचण्यासाठी पुढे सरसावली. मात्र, दुर्दैवाने त्यांनाही शॉक बसला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यासोबतच शेळी आणि नातवाचा देखील मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
Nashik News: FDAचा मोठा दणका! नाशिकमधील 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश
Ans: सातारा जिल्ह्यातील फलटण-पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात हा भीषण अपघात घडला.
Ans: या दुर्घटनेत बारामतीतील योगेश पोपट जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.
Ans: मुसळधार पावसामुळे ताथवडे घाटात दरड कोसळल्याने चारचाकी वाहन त्याखाली दबले आणि हा भीषण अपघात झाला.






