Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीत पुन्हा निर्भया कांड! वेळ विचारण्याचा बहाणा अन् थेट बसमध्ये ओढलं; धावत्या बसमध्ये महिलेवर दोन तास सामूहिक अत्याचार 

दिल्लीत पुन्हा एकदा निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वेळ विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेला बसमध्ये ओढूलं आणि दोन तास सामूहिक अत्याचार  केल्याची घटना समोर आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 14, 2026 | 12:18 PM
गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार;

गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार;

Follow Us
Follow Us:
  • राजधानीत महिलांची सुरक्षा पुन्हा प्रश्नचिन्हात
  • धावत्या बसमध्ये निर्भयासारखी क्रूर घटना
  • वेळ विचारण्याचा बहाणा अन् थेट बसमध्ये ओढलं
 

Delhi Crime News Marathi : १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीत एका धावत्या बसमध्ये २३ वर्षीय फिजिओथेरपीची विद्यार्थिनी निर्भयावर झालेल्या क्रूर सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या क्रूर घटनेमुळे देशभरात व्यापक आंदोलने पेटली. चारही दोषींना २० मार्च २०२० रोजी फाशी देण्यात आली. दिल्लीत निर्भया घटनेच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.

दिल्लीत सोमवारी (11 मे 2026) रात्री उशिरा राणी बाग परिसरात एका धावत्या स्लीपर बसमध्ये एका ३० वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली बस जप्त केली असून, पीडितेच्या जबाबाच्या आधारे एफआयआर दाखल केला आहे आणि आरोपींचा शोधात आहे.

Beed Crime: संतापजनक! 65 वर्षीय नराधमाकडून साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; खाऊचे आमिष अन्…

वेळ विचारण्याच्या बहाण्याने बसमध्ये ओढले अन्…

पीडित महिला, रझिया (नाव बदलले आहे), पीतमपुराच्या झोपडपट्टीत राहते आणि मंगोलपुरी येथील एका कारखान्यात काम करते. 11 मे रोजी रात्री ती कामावरून पायी घरी परतत होती. जेव्हा ती सरस्वती विहारमधील बी-ब्लॉक बस स्टँडवर पोहोचली, तेव्हा एक स्लीपर बस थांबली. पीडितेने बसच्या दारात उभ्या असलेल्या एका तरुणाला वेळ विचारली, पण उत्तर देण्याऐवजी आरोपीने तिला जबरदस्तीने बसमध्ये ओढले.

सात किलोमीटर दूर नेले

पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिला बसमध्ये ओढल्याबरोबर आरोपीने दरवाजा बंद केला आणि चालकाला बस घेऊन जाण्यास सांगितले. दोन तरुणांनी धावत्या बसमध्ये तिच्यावर बलात्कार केला. ही घटना नांगलोई मेट्रो स्टेशनपर्यंत सुमारे सात किलोमीटरपर्यंत सुरू राहिली. जवळपास दोन तास लैंगिक अत्याचार केल्यानंतर, आरोपीने पीडितेला पहाटे २ वाजण्याच्या सुमारास रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्यावर सोडून दिले आणि आरोपींनी तेथून पळ काढला.

वैद्यकीय तपासणीत बलात्काराची पुष्टी

घटनेनंतर पीडितेने तात्काळ पोलिसांना फोन केला. सुरुवातीला नांगलोई पोलीस स्टेशनला फोन केला होता. परंतु घटना राणी बाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने, प्रकरण तिथे वर्ग करण्यात आले. राणी बाग पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद दिला. एका महिला उपनिरीक्षकाने पीडितेला तातडीने बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले, जिथे वैद्यकीय तपासणीत बलात्काराची पुष्टी झाली.

दाखल घेण्यास नकार

पीडितेची प्रकृती गंभीर असल्याने, रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला दाखल करण्याचा सल्ला दिला. परंतु तिने नकार दिला. पीडितेने सांगितले की तिच्या पतीला क्षयरोग आहे आणि तो घरीच राहतो. तिला ८, ६ आणि ४ वर्षांच्या तीन मुली आहेत. जर तिला रुग्णालयात दाखल केले, तर मुलांना कोण खाऊ घालणार? आर्थिक अडचणी आणि मुलांच्या जबाबदारीमुळे, गंभीर जखमी असूनही ती घरातूनच उपचार घेत आहे.

पोलिसांचे पथक सीसीटीव्ही फुटेज…

पोलिसांनी बिहार नोंदणी क्रमांक असलेली बस जप्त केली आहे. बस मालकाशी संपर्क साधून चालक आणि दोन मुख्य आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले जात असून, त्यांना लवकरच अटक केली जाईल. बसचा मार्ग आणि आरोपींच्या हालचालींची पुष्टी करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.

बस पडद्यांनी झाकलेली होती

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बसचा मार्ग तपासला जात आहे. शिवाय, बस पडद्यांनी झाकलेली असल्याचे आढळून आले, ज्यामुळे आतील दृश्य अस्पष्ट दिसत होते. बसच्या आतून पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले आहे. बस जप्त करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Ashok Kharat Case : अशोक खरातप्रकरणी मोठी अपडेट समोर; खरातचे आणखी 6 महिलांसोबत…

Web Title: Delhi moving running bus gangrape nirbhaya like case woman assault marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • crime
  • delhi
  • police

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
2

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Ujjain Shahi Masjid: शाही मशिदीच्या कारवाईवरून उज्जैनमध्ये गोंधळ; जमाव-पोलिसांत संघर्ष, दगडफेकीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या
3

Ujjain Shahi Masjid: शाही मशिदीच्या कारवाईवरून उज्जैनमध्ये गोंधळ; जमाव-पोलिसांत संघर्ष, दगडफेकीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
4

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.