Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Fire News: राजधानी दिल्लीत खळबळ! संसदेजवळील ‘नॉर्थ ब्लॉक’मागे भीषण आग; या प्रसंगाने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Delhi Fire News: देशाची राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे! संसदेच्या अगदी जवळ असलेल्या अतिसंवेदनशील नॉर्थ ब्लॉकच्या मागे सोमवारी अचानक धुराचे काळे लोळ दिसल्याने एकच घबराट पसरली. खासदार मिलिंद देवरांच्या ट्विटनंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 26, 2026 | 01:12 PM
Delhi Fire News: राजधानी दिल्लीत खळबळ! संसदेजवळील 'नॉर्थ ब्लॉक'मागे भीषण आग; या प्रसंगाने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Delhi Fire News: राजधानी दिल्लीत खळबळ! संसदेजवळील 'नॉर्थ ब्लॉक'मागे भीषण आग; या प्रसंगाने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • संसदेजवळ अचानक आग लागून धुराचे काळे लोळ पसरले
  • खासदार मिलिंद देवरांच्या ट्विटनंतर प्रशासनाची धावपळ उडाली
  • गाड्या घटनास्थळी दाखल; सुदैवाने जीवितहानी नाही
Delhi Fire News: देशाची राजधानी दिल्लीतून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. संसदेच्या अगदी जवळ असलेल्या अत्यंत संवेदनशील अशा नॉर्थ ब्लॉकच्या (North Block) मागच्या बाजूस सोमवारी सकाळी अचानक धुराचे काळे लोळ दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संसदेच्या परिसराजवळ घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळाकडे रवाना करण्यात आल्या आहेत.

खासदार मिलिंद देवरांच्या ट्विटमुळे उडाली धावपळ

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा हे संसदेच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांना नॉर्थ ब्लॉकमागे निघणारे धुराचे मोठे लोट दिसले. त्यांनी तातडीने सोशल मीडियावर ट्विट करत या घटनेबाबत चिंता व्यक्त केली. परिसरातील सर्व लोक सुरक्षित असावेत आणि आपत्कालीन यंत्रणा वेगाने प्रतिसाद देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. खासदार देवरा यांच्या ट्विटनंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची तातडीने धावपळ उडाली.

हेही वाचा: Pune News: मैत्रीण धावली म्हणून वाचला जीव! पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरात १८ वर्षीय तरुणीला भररस्त्यात उचलून नेण्याचा प्रयत्न…

अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशामक दलाने तात्काळ कारवाई करत पाण्याचा बंब घटनास्थळावर रवाना केले आहेत. आगीचे नेमके स्वरूप काय आहे किंवा कोणत्या इमारतीला/संरचनेला याचा फटका बसला आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त मिळालेले नाही.

हेही वाचा: Kolhapur Crime News: चोरी केली, थार घेतली अन् चुलत्याकडूनच कौतुक करून घेतले! कोल्हापुरातील अजब चोरीचा पर्दाफाश

नॉर्थ ब्लॉकचे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्व

नॉर्थ ब्लॉक ही नवी दिल्लीतील अत्यंत महत्त्वाची आणि सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील शासकीय इमारत आहे. यामध्ये देशाचे गृह मंत्रालय (Home Ministry) आणि वित्त मंत्रालय (Finance Ministry) यांसारखी अत्यंत महत्त्वाची सरकारी कार्यालये कार्यरत आहेत. हा परिसर सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा भाग असून संसद भवनाच्या अतिशय जवळ आहे. त्यामुळे या उच्च सुरक्षेच्या भागात अचानक धुराचे लोळ दिसल्याने सर्वच सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत.

Noticed thick smoke rising from behind North Block while on my way to Parliament. It appears there may be a fire. Hope everyone is safe and emergency services are responding swiftly. https://t.co/mnUqpWfsWl — Milind Deora | मिलिंद देवरा (@milinddeora) October 26, 2026
💡

Frequently Asked Questions

  • Que: ही आगीची घटना दिल्लीत कुठे घडली?

    Ans: ही घटना नवी दिल्लीतील संसदेजवळ असलेल्या अतिसंवेदनशील नॉर्थ ब्लॉकच्या मागच्या बाजूला घडली.

  • Que: या घटनेची माहिती प्रथम कोणी दिली?

    Ans: संसदेच्या दिशेने प्रवास करत असताना खासदार मिलिंद देवरा यांनी धुराचे लोळ पाहून ट्विटद्वारे ही माहिती दिली.

  • Que: नॉर्थ ब्लॉक इमारतीत कोणती महत्त्वाची कार्यालये आहेत?

    Ans: नॉर्थ ब्लॉकच्या इमारतीत देशाचे गृह मंत्रालय आणि वित्त मंत्रालय ही अतिशय महत्त्वाची सरकारी कार्यालये आहेत.

Web Title: Delhi north block fire near parliament milind deora tweet news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • about fire news
  • crime news delhi
  • delhi
  • Fire News

संबंधित बातम्या

दिल्लीमध्ये 1 नोव्हेंबरपासून Non-BS6 वाहनांना नो-एंट्री! बाहेरून येणाऱ्या गाड्यांवर निर्बंध
1

दिल्लीमध्ये 1 नोव्हेंबरपासून Non-BS6 वाहनांना नो-एंट्री! बाहेरून येणाऱ्या गाड्यांवर निर्बंध

‘दिवाळीत धंदा बुडवू नका!’ Rahul Gandhi यांच्या रॅलीवरून दिल्लीतील व्यापारी आक्रमक; 10000 कोटींच्या व्यापारावर परिणामाची भीती
2

‘दिवाळीत धंदा बुडवू नका!’ Rahul Gandhi यांच्या रॅलीवरून दिल्लीतील व्यापारी आक्रमक; 10000 कोटींच्या व्यापारावर परिणामाची भीती

AI in Fire Prevention : डिटेक्शन सिस्टीम, अलार्म, हायड्रंट्स आणि स्प्रिंकलर सेन्सर्सद्वारे आपत्कालीन अलर्ट मिळण्यास मदत
3

AI in Fire Prevention : डिटेक्शन सिस्टीम, अलार्म, हायड्रंट्स आणि स्प्रिंकलर सेन्सर्सद्वारे आपत्कालीन अलर्ट मिळण्यास मदत

कुर्ल्यातील १३ मजली इमारतीला भीषण आग; ५ वर्षांच्या चिमुकल्यासह ९ जण जखमी, इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगने घेतला पेट
4

कुर्ल्यातील १३ मजली इमारतीला भीषण आग; ५ वर्षांच्या चिमुकल्यासह ९ जण जखमी, इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगने घेतला पेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.