
गुन्हा दाखल होऊनही गौण खनिजावर माफियांचा डल्ला! (Photo Credit - X)
जप्त हायवा चोरी आणि चोरीचा प्रयत्न
सातारा परिसरात गट क्र. १६ येथे वाळूची बेकायदा वाहतूक करताना हा हायवा तहसील कार्यालयाने जप्त केला होता आणि अप्पर तहसील कार्यालयात उभा करण्यात आला होता. याच हायवा तहसील कार्यालयातून चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर तहसील कार्यालयाच्या अवैध गौण खनिज प्रतिबंधक पथकाचे अजित गावंडे यांच्या पथकाने २६ नोव्हेंबरला पहाटे कांचनवाडी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला होता. ३० नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत हा हायवा त्याच स्थितीत होता. परंतु, दुसऱ्या दिवशी (१ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता) चोरीच्या उद्देशाने तो हायवा दुसऱ्या ठिकाणी हलवला गेला आणि त्यातील वाळू खाली करून उभा करण्यात आल्याचे समोर आले.
याप्रकरणी, हायवा चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हायवा मालक ईसा बावा सय्यद (वय ३६, रा. शिपूर) आणि चालक अकबर हानिफ शेख (वय ३६, रा. इसारवाडी) या दोघांविरोधात अप्पर तहसीलचे सहायक महसूल अधिकारी जितेंद्र एकनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंगर पोखरण्याचे काम सुरूच
शहरातील डोंगर पोखरण्याचे काम माफियांकडून खुलेआम केले जात आहे. गौण खनिज विभागाने या बेकायदेशीर कामांकडे लक्ष देणे गरजेचे असताना, महसूल विभाग कारवाई करत असतानाही हा विभाग त्यांना मोहिमेत साथ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. गौण खनिज विभाग आणि त्यांचे पथक पर्यावरणाचे संतुलन राखण्याऐवजी त्यांच्या देखरेखीखाली खुलेआम खनिज उपसा करण्याचे प्रकार घडत असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अनेकदा आदेश देऊनही आदेशाचे पालन होत नसल्याने माफियांची दादागिरी वाढली आहे. महसूल विभागाच्या पथकावर हल्ले करून त्यांना जखमी करण्याचे प्रकार वाढले आहेत.
हे देखील वाचा: Navi Mumabai : वनविभाग ठरलं अपयशी ; ठोस पुराव्यांअभावी बिवलकरांना क्लीनचीट