Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: खाजगी शाळेतील विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल

धाराशिव शहरातील एका खाजगी शाळेत विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 04, 2026 | 06:58 PM
खाजगी शाळेतील विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-Gemini)

खाजगी शाळेतील विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:

धाराशिव : शहरातील एका खाजगी माध्यमिक शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला किरकोळ कारणावरून काठीने मारहाण केल्याची आणि या प्रकरणी संबंधित शिक्षकावर पोलिसांत गुन्हा नोंद झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून संबंधित शिक्षकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

ही घटना १ एप्रिल रोजी जाधववाडी रोडवरील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथे घडली. साईरामनगर येथील गोपाळ नारायण कोळी यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा १३ वर्षीय मुलगा मनीषराज गोपाळ कोळी याने विशिष्ट वही आणली नसल्याच्या कारणावरून शिक्षक प्रफुल जाधव यांनी त्याला काठीने मारहाण केली. मारहाणीत विद्यार्थ्याच्या उजव्या खांद्यावर, डाव्या हातावर, पाठीवर तसेच डाव्या पायावर दुखापत झाली आहे. घटनेमुळे विद्यार्थ्याला मानसिक धक्का बसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

Satara Crime : कराड बनलाय ‘ओपन बार’; पोलिसांचं दुर्लक्ष आणि ड्रग्जचा खुलेआम व्यापार

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कलम ११८ (१) तसेच बाल न्याय (काळजी व संरक्षण) कायदा २०१५ मधील कलम ७५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित शिक्षकाने यापूर्वीही दोन वेळा विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला असून, वारंवार अपमानास्पद वागणूक दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

या प्रकारानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली आणि नंतर पोलिसांत धाव घेतली. पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शाळा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे सांगितले असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Nagpur Crime: घराबाहेर चकरा का मारतोस विचारण पडल महागात, एकाची थेट हत्या; नागपुरातील घटना!

Web Title: Dharashiv private school student assault case teacher booked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • Dharashiv
  • education
  • School

संबंधित बातम्या

NDRF जवानांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’; जवानांसह कुटुंबीयांनाही मिळणार आधार
1

NDRF जवानांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’; जवानांसह कुटुंबीयांनाही मिळणार आधार

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित
2

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप
3

MPSC Combined Exam: कारभाराचा बोजवारा! कॉम्प्युटर कमी पडले अन् MPSC स्क्रीनिंग टेस्ट रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Education Budget India: देशात शिक्षणावर पाणी सोडणारी ‘ही’ आहेत सर्वात कंजूस राज्ये; अहवालातील धक्कादायक खुलासे!
4

Education Budget India: देशात शिक्षणावर पाणी सोडणारी ‘ही’ आहेत सर्वात कंजूस राज्ये; अहवालातील धक्कादायक खुलासे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.