धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दहिवद येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावर चार दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत 22 हजार रुपयांची रोकड लुटल्याचे समोर आले आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सदाशिव पेट्रोलियम पंपावर घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास चार संशयित एकाच दुचाकीवर येऊन पेट्रोल पंपावर पोहोचले. त्यापैकी दोघांच्या हातात पिस्तूल होते. पंपावर ड्युटीवर असलेले कर्मचारी सोमनाथ गवळी, सुनील नगराळे व संतोष नगराळे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून पैश्यांची मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच संशयितांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर रोकड भरलेली बॅग हिसकावून घेऊन चौघेही आरोपी दुचाकीवरून पसार झाले.
घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
घटनेच्या वेळी पेट्रोल पंपाच्या शेजारील हॉटेल बंद होते. तसेच सुरक्षा रक्षक रजेवर होता. याचाच फायदा घेत दरोडेखोरांनी ही धाडसी चोरी केली. दरोडेखोरांनी
चेहऱ्यावर कापड गुंडाळलेले होते, त्यामुळे त्यांची ओळख स्पष्टपणे पटली नाही. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली.
दरोड्यानंतर घटनेची माहिती पेट्रोल पंपाचे संचालक तरुण शर्मा यांनी तातडीने पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने पंचनामा केला. दरम्यान दरोडेखोरांचे संपूर्ण कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. पोलिसांनी सीसीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शाळेत बारावी फॉर्म भरताना मोठा वाद; पालकांकडून कर्मचाऱ्यावर हल्ला
धुळे येथून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. बारावीच्या परीक्षेचा फॉर्म भारण्यावरून शाळेत काही पालकांनी शाळेतील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्ही शाळेला टाळे ठोकून काम बंद आंदोलन करू, अशी आक्रमक भूमिका शाळा प्रशासनाने घेतली आहे.