नेमकं काय घडलं?
ही घटना हिमाचल प्रदेशातील मंडी येथे घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नंद लाल सतत ममताला मारहाण करायचा. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरु होता. ममता खूप आजारी पडली. ती तिच्या वागण्याला कंटाळली होती. तिने एक सोशल मीडियावर एक पोस्टसुद्धा केली होती. त्यात तिने पाटीवर गंभीर आरोप केले होते. याच कारणामुळे, नंदलाल पत्नीवर प्रचंड संतापला होता.
१५ नोव्हेंबर रोजी नंद लाल आणि ममता यांच्यात मोठा वाद झाला. भांडण सुरु असतांना नंद लालने रागाच्या भरात पत्नीवर अॅसिड फेकलं. एवढेच नाही तर तिला छतावरून खाली ढकललं. यामुळे पीडिता खाली कोसळली आणि गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. शेजाऱ्यांनी ममताला रक्ताने माखलेल्या अवस्थेत पाहिलं आणि तिला मंडीच्या रुग्णालयात नेण्यात आलं.
तिची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला तातडीने PGI चंदीगड येथे रेफर केलं. तिथे डॉक्टरांनी चार दिवस तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण अॅसिडमुळे जळजळ आणि गंभीर जखमांमुळे तिची प्रकृती खालावली आणि बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाला.
आरोपीला अटक
पीडितेच्या नातेवाईकांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. मात्र ममताच्या मृत्यूनंतर आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणासंबंधी कायदेशीर कारवाई केली जाणार असून घटनेचा तपास अद्याप सुरू असल्याची माहिती आहे.
Ans: ममता
Ans: नंदलाल
Ans: मंडी






