Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरट्यांच्या दिवाळीवर फिरले पाणी! पोलिसांनी एकाच दिवसात केला 3 घरफोड्यांचा केला पर्दाफाश, तब्बल…

घरफोडी प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमधील संशयिताच्या चालण्याच्या लकबीवरून त्याचा माग काढण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 21, 2025 | 07:19 PM
चोरट्यांच्या दिवाळीवर फिरले पाणी! पोलिसांनी एकाच दिवसात केला 3 घरफोड्यांचा केला पर्दाफाश, तब्बल…
Follow Us
Follow Us:

दिघी पोलिसांची दमदार कारवाई
तीन घरफोड्यांची केली उकल
साडे चार लाखांचा ऐवज जप्त

पिंपरी: दिघी पोलिस ठाण्याच्या पथकाने केवळ काही तासांत सलग तीन घरफोड्यांच्या गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी एका संशयिताला जेरबंद करत त्याच्याकडून १४५ ग्रॅम सोन्याचे दागिने, सहा मोबाईल फोन आणि ३२ हजार रुपये रोख असा एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

रोहित रायमशी मत्तू (३२, रा. भारतमाता नगर, दिघी. मूळ रा. जम्मू काश्मीर), असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजानन महाराज नगर येथील परमेश्वर बापूराव गिराम (वय ५९) यांच्या घरात १५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरफोडी झाली होती. त्यात १४ तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळाची आणि परिसराची पाहणी केली. त्यावेळी दिघी परिसरातील संतोष तानाजी खोत आणि प्रतिभा पाटील यांच्या घरातही चोरी झाल्याबाबत वरिष्ठ निरीक्षक वाघ यांना माहिती मिळाली. त्यांनी तपास पथकाला सूचना करून तिन्ही घटनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तीन्ही घरफोडीच्या घटनांमध्ये एक संशयित व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आला. त्यावरून तीन्ही घरफोड्यांमध्ये एकाच संशयिताचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.

Crime News: गुन्हेगारांवर वचकच नाही! टेम्पो बाजूला घ्यायला सांगितले म्हणून चालकाने थेट महिला पोलिसावर…

घरफोडी प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमधील संशयिताच्या चालण्याच्या लकबीवरून त्याचा माग काढण्यात आला. त्यासाठी दिघी पोलिसांच्या तपास पथकाने सापळा रचून अवघ्या काही तासांत संशयिताला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान संशयिताकडून चोरीच्या सोन्याचा व चांदीचा मुद्देमाल, सहा मोबाईल फोन, रोख ३२ हजार ३० रुपये, घड्याळे, हेडफोन आणि गुन्ह्यात वापरलेले कपडे हस्तगत केले. पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त सुधाकर यादव, दिघीचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ, निरीक्षक विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक श्रीनिवास कामूनी, हवालदार योगेश नागरगोजे आणि तपास पथक यांनी केली.

टेम्पो चालकाची महिला पोलिसाला मारहाण

टेम्पो चालकाने त्याचा टेम्पो पिंपरी मार्केटमध्ये रस्त्यात लावला. त्याला टेम्पो बाजूला घेण्यास सांगितल्याने टेम्पो चालकाने महिला वाहतूक पोलिसाला मारहाण केली. ही घटना सोमवारी (20 ऑक्टोबर) दुपारी एक वाजताच्या सुमारास शगुन चौकाजवळ पिंपरी येथे घडली. शरद अशोक कांबळे (25, मांजरी खुर्द, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई जयश्री जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Dighi police arrested criminals burglary and seized 4 50 lakhs crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 07:19 PM

Topics:  

  • crime news
  • PCMC News
  • Pimpri Crime

संबंधित बातम्या

Buldhana News: मजुरीच्या पैशावरून चाकूने प्राणघातक हल्ला; पिंपळगाव काळे येथे पेटला होता वाद
1

Buldhana News: मजुरीच्या पैशावरून चाकूने प्राणघातक हल्ला; पिंपळगाव काळे येथे पेटला होता वाद

सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई
2

सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी
3

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी

धक्कादायक ! अश्लील फोटोसाठी सातवीतील मुलीवर दबाव; ऑनलाईन ओळख झाली अन् नंतर त्याच…
4

धक्कादायक ! अश्लील फोटोसाठी सातवीतील मुलीवर दबाव; ऑनलाईन ओळख झाली अन् नंतर त्याच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.