बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेच्या मुसक्या आवळल्या; अटक करताच 'पुष्पा' स्टाईल अॅक्शन
लातूर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर बीड जिल्ह्यातील पोलिसांचे एक एक कारनामे समोर आले आहेत. त्यात बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याच्या वक्तव्यांनी तर पोलीस खात्याची लक्तरं वेशीवर टांगली. त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले. बीड कारागृहात असताना त्यांनी वाल्मीक कराड याला चिकण, मटण आणि सर्व सोयीसुविधा देण्यात येत असल्याचा दावा केला होता. कासलेंनी आत्तापर्यंत सोशल मीडिया खात्यावरून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. अशातच आता आणखी एका प्रकरणात रणजीत कासलेला गुजरात पोलिसांनी लातुरमधून अटक केली आहे.
रणजीत कासले याला मध्यरात्रीच्या सुमारास गुजरात पोलिसांनी लातूरमधून अटक केली. गुजरात राज्यातील सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या जबरी घरफोडी प्रकरणी अटक असलेल्या आरोपींकडून रणजीत कासले याच्याबाबत माहिती मिळाली. या आरोपींना मदत करणे किंवा इतर सहकार्य पुरवणे अशा स्वरूपाचा संशय गुजरात पोलिसांना असल्यामुळे त्यांनी दोन दिवसापासून लातूर शहरात रणजीत कासले याला अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरू केली होती.
लातूर पोलीस त्याचबरोबर गुजरात पोलीस यांनी एकत्रित केलेल्या मोहिमेमुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रणजीत कासले याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कागदपत्राची पूर्तता करून सहा जणांच्या पथकाने रणजीत कासले याला गुजरात येथील सुरत भागातील पाल पोलीस स्टेशनकडे घेऊन गेले आहेत.
कोण आहे रणजीत कासले?