Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खाकी वर्दीला लाचखोरीचा डाग, दीड वर्षात 20 सापळे कारवाया; सर्वसामान्यांमध्ये अविश्वासाची भावना

पोलिस दलालाच आता भ्रष्टाचाराचा डाग लागल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या दीड वर्षांत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल २० जणांना सापळा रचून पकडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 15, 2026 | 12:00 PM
खाकी वर्दीला लाचखोरीचा डाग, दीड वर्षात 20 सापळे कारवाया; सर्वसामान्यांमध्ये अविश्वासाची भावना

खाकी वर्दीला लाचखोरीचा डाग, दीड वर्षात 20 सापळे कारवाया; सर्वसामान्यांमध्ये अविश्वासाची भावना

Follow Us
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : ‘खाकी’ म्हणजे शिस्त, धाक आणि विश्वास अशी ओळख असलेल्या पोलिस दलालाच आता भ्रष्टाचाराचा डाग लागल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या दीड वर्षांत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल २० जणांना सापळा रचून पकडले आहे. या घटनांनी सर्वसामान्यांत पोलिसांविषयी अविश्वासाची भावना वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, पुणे ग्रामीण भागात सर्वाधिक प्रकरणे उघडकीस आली असून, भ्रष्टाचारविरोधी यंत्रणांसमोर हे मोठे आव्हान ठरत आहे.

 

शिस्त आणि विश्वासोबतच कायदा-सुव्यवस्था राखणारे, संकटात धावून येणारे आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे अशी पोलिस दलाची ओळख. पण, गेल्या काही वर्षात पोलिस दल वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने चर्चेत व बदनाम होत असल्याचे प्रकर्षाने जानवत आहे. कधी पोलिसच आरोपी पिंजऱ्यात उभा राहत आहेत, तर कधी सेटलमेंट प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. यासोबतच शिस्तप्रिय दलात अशिस्तीने वागणारे सोबतच कर्तव्यावर मद्यपान करणे अशा एकना अनेक कारणांनी पोलिस दल चर्चेत राहत आहे. त्यात भर पडू लागली आहे ती, सातत्याने होत असलेल्या लाच प्रकरणांची.

गेल्या महिन्यात पुणे शहर पोलिस दलात झालेल्या सलग लाचेच्या सापळा कारवाईने आज पुन्हा एकदा हे चर्चेत आले आहे. एखाद्या तक्रारीवर कारवाई करणे, गुन्ह्यात मदत करणे, चौकशीतील सवलत, दाखले किंवा तपासात सहकार्य, अटक न करणे अशा विविध कारणांसाठी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये “पैसे दिल्याशिवाय काम होत नाही” अशी भावना देखील अधिक बळावत असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, पोलिस दल हे राज्यातील सर्वाधिक शिस्तप्रिय आणि जबाबदार यंत्रणा म्हणून ओळखले जाते. पोलिस अधिकाऱ्यांवर मोठा सामाजिक विश्वास असतो. गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करणाऱ्या याच यंत्रणेतील काही जणांना लाच घेताना पकडले जात असल्याने संपूर्ण दलाची प्रतिमा मलिन होत आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या हजारो पोलिस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अशा घटनांमुळे समाजासमोर मान खाली घालावी लागते, अशी भावना अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. यामुळे हा बदल होणे गरजेचा असून, अन्यथा, कायद्यावर आणि खाकीवरील जनतेचा विश्वास ढासळण्याचा धोका वाढत असल्याची भिती व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : भाचीशी बोलणाऱ्या तरुणांना कारने उडवलं; CCTVमुळे कट उघड, दोघे मामा अटकेत

लाचखोरीचे जाळे

विभाग २०२५ २०२६ (७ मेपर्यंत) एकूण
पुणे शहर ३ ३ ६
पिंपरी-चिंचवड ५ ० ५
पुणे ग्रामीण ६ ३ ९
एकूण १४ ६ २०

Web Title: Distrust has arisen among ordinary citizens because the police themselves are accepting bribes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • Bribe Case
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
1

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
2

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
3

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?
4

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.