Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

आनंदाच्या सहलीसाठी आळंदीहून रायगडला गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. दिवेआगरच्या समुद्रात आठ विद्यार्थी बुडाले अन् काही वेळातच सहलीचे ठिकाण आक्रोशाने हादरले; श्रीवर्धन रुग्णालयाबाहेर पालकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहायला मिळाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 02, 2026 | 09:39 AM
Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • दिवेआगर समुद्रात आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
  • ४२ विद्यार्थी आणि दोन शिक्षक सहलीसाठी गेले होते
  • अकॅडमी बेकायदेशीर असल्यास कारवाईचा पोलिसांचा इशारा
रायगड : आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या सहलीसाठी रायगडमधील दिवेआगर येथे गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातून श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. रात्री उशिरा पुण्याहून नातेवाईक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह पुण्याकडे रवाना करण्यात आले.

रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा आक्रोश

विद्यार्थ्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांचे पालक आणि नातेवाईक रायगडच्या दिशेने रवाना झाले. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह पाहिल्यानंतर नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. आपल्या मुलांना गमावल्याच्या धक्क्याने रुग्णालय परिसरात आक्रोशाचे वातावरण होते.

हेही वाचा: Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट

४२ विद्यार्थी, दोन शिक्षक सहलीसाठी

आळंदी येथील विनर्स अकॅडमीचे ४२ विद्यार्थी आणि दोन शिक्षक रायगड व दिवेआगर येथे सहलीसाठी गेले होते. दिवेआगर समुद्रकिनारी गेल्यानंतर आठ विद्यार्थी समुद्रात बुडाले. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.

पोलिसांच्या भूमिकेवर अदिती तटकरे नाराज

घटनेनंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे रात्री उशिरा श्रीवर्धन येथे दाखल झाल्या. त्यांनी मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. विद्यार्थ्यांची बस रात्री दिवेआगरहून ताम्हिणी घाटमार्गे आळंदीला रवाना झाली असताना, विद्यार्थ्यांची मनःस्थिती घाबरलेली होती. अशा परिस्थितीत बससोबत पोलीस कर्मचारी का देण्यात आला नाही, असा सवाल त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केला. पोलिसांच्या या भूमिकेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…

धोकादायक समुद्रकिनाऱ्यांवर उपाययोजना करणार

खासदार सुनील तटकरे यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. दिवेआगर समुद्रकिनारा सुरक्षित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री भरत गोगावले यांनीही रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली. धोकादायक समुद्रकिनाऱ्यांवर ठोस उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांना मदतीबाबत सरकार विचार करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही दुर्घटनेला अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगत, निसर्गाच्या मर्यादा लक्षात घेऊन समुद्रकिनाऱ्यावर काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.

अकॅडमीविरोधात कारवाईचे आश्वासन

दरम्यान, विनर्स अकॅडमीच्या व्यवस्थापनाविरोधातही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अकॅडमी बेकायदेशीर असल्याचे आढळल्यास योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आळंदी-दिघी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजणकर यांनी सांगितले. रायगड पोलीस आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्कात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेनंतर अकॅडमीच्या बाहेर पालक आणि नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, पालकांनी आणि नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title: Diveagar sea alingi winners academy eight students drown raigad sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Accident Case
  • Accident Death
  • Accident News
  • Raigad Accident
  • Raigad News

संबंधित बातम्या

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत
1

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
2

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
3

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा
4

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.