Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’ला थेट ठोकले सील

दिवेआगरच्या समुद्रात आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर प्रशासनाने आळंदीत कारवाईचा धडाका सुरू केला. शहरातील कोचिंग क्लासेसची झाडाझडती सुरू असतानाच दुर्घटनाग्रस्त ‘विनर्स अकॅडमी’कडे आवश्यक परवाने आणि NOC नसल्याचे समोर आले अन् पोलिस बंदोबस्तात अकॅडमीला सील ठोकण्यात आले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 02, 2026 | 04:34 PM
आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’ला थेट ठोकले सील

आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’ला थेट ठोकले सील

Follow Us
Follow Us:
  • दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदी नगरपरिषदेची धडक कारवाई
  • ‘विनर्स अकॅडमी’कडे व्यवसाय परवाना आणि NOC नसल्याचे समोर
  • पोलीस बंदोबस्तात अकॅडमीची इमारत सील; इतर क्लासेसचीही तपासणी सुरू
 

आळंदी : दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत कोचिंग क्लासेस आणि विविध आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. या कारवाईत दिवेआगर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांशी संबंधित ‘विनर्स अकॅडमी’वर थेट सील ठोकण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या विशेष पथकाने संबंधित इमारतीची पाहणी केली असता अकॅडमीकडे व्यवसाय परवाना तसेच ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) नसल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा: कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

परवानगीविना सुरू होता कोचिंग क्लास

नगरपरिषदेच्या माहितीनुसार, श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीच्या मालमत्ता क्रमांक जुना ११३७ (नवीन LAN00001729) या इमारतीत ‘विनर्स अकॅडमी’ नावाने कोचिंग क्लासेस सुरू होते. नगरपरिषदेच्या अभिलेखांची तपासणी केली असता अकॅडमीने व्यवसाय परवाना किंवा आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित क्लासचा कारभार आवश्यक परवानग्यांशिवाय सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पोलीस बंदोबस्तात अकॅडमीला सील

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कारवाई केली. पोलीस बंदोबस्तात विनर्स अकॅडमीच्या इमारतीला टाळे ठोकून ती सील करण्यात आली.

हेही वाचा: Crime News: डॉक्टरांनी सांगितले ‘तातडीने सिझेरियन करा’… उपचार रखडले अन् ९ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचाही…

शहरातील इतर क्लासेसचीही तपासणी

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदी नगरपरिषदेने शहरातील कोचिंग क्लासेस तसेच इतर आस्थापनांच्या परवानग्यांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सर्व शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लासेसनी आवश्यक व्यवसाय परवाने, ना-हरकत प्रमाणपत्रे आणि इतर कायदेशीर परवानग्या घेऊनच कारभार करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नगरपरिषदेने दिला आहे. दिवेआगर समुद्रकिनारी झालेल्या दुर्घटनेत आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कारवाईमुळे अनधिकृतपणे सुरू असलेल्या शैक्षणिक आस्थापनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Diveagar student death winners academy sealed alandi municipal action sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Coaching Classes
  • Crime . Crime News
  • Municipal Council

संबंधित बातम्या

Crime News: डॉक्टरांनी सांगितले ‘तातडीने सिझेरियन करा’… उपचार रखडले अन् ९ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचाही…
1

Crime News: डॉक्टरांनी सांगितले ‘तातडीने सिझेरियन करा’… उपचार रखडले अन् ९ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचाही…

Crime News: ‘पत्नीशी संबंध असल्याचा संशय’; तरुणाला शेतात नेले अन् फरशी-दगडाने ठेचून…
2

Crime News: ‘पत्नीशी संबंध असल्याचा संशय’; तरुणाला शेतात नेले अन् फरशी-दगडाने ठेचून…

ट्रिपल सीट जाताना पोलिसांनी अडवले अन् भांडाफोड; मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी चोरल्या तीन दुचाकी!
3

ट्रिपल सीट जाताना पोलिसांनी अडवले अन् भांडाफोड; मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी चोरल्या तीन दुचाकी!

Crime News: दोन इंजेक्शन्स दिली अन् काही वेळातच चिमुकलीच्या नाक-तोंडातून रक्त; वसईत धक्कादायक घटना
4

Crime News: दोन इंजेक्शन्स दिली अन् काही वेळातच चिमुकलीच्या नाक-तोंडातून रक्त; वसईत धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.