Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

पिंपरी-चिंचवडमध्ये हुंड्याच्या छळामुळे आणखी एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींवर याप्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 19, 2025 | 06:37 PM
पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : गेल्या काही महिन्याखाली वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना ताजी असतानाच आणखी एक आत्महत्येची घटना समोर आली आहे. वाकडमधील W-57 सोसायटीत दिव्या सूर्यवंशी यांचा मृतदेह राहत्या घरात गळफास लागलेल्या अवस्थेत आढळला आहे. ही आत्महत्या नसून खून असून, तिच्या पतीसह सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ केला आणि खून केला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये हुंड्याच्या छळामुळे आणखी एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींवर याप्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिव्या हर्षल सूर्यवंशी असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील W-57 सोसायटीत 26 वर्षीय दिव्या हर्षल सूर्यवंशी हिचा राहत्या घरात गळफास लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही आत्महत्या नसून खून असल्याचा गंभीर आरोप दिव्याच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी दिव्याचे पती हर्षल शांताराम सूर्यवंशी आणि सासरच्या मंडळींविरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

दिव्याच्या माहेरच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, तिला सातत्याने हुंड्यासाठी छळले जात होते. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रास होत होता. दिव्याचा पती आणि सासरच्या कुटुंबीयांनी तिचा खून केला आहे. यापूर्वीही पिंपरी-चिंचवड परिसरात हुंड्याच्या छळामुळे वैष्णवी नावाच्या तरुणीचा बळी गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता आणखी एक हुंडाबळीचा प्रकार समोर आला आहे.

दिव्याच्या मृत्यूप्रकरणी वाकड पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दिव्याच्या कुटुंबांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सासरच्या मंडळींची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हुंडाबळीच्या घटनांवरून पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली आहे.

Web Title: Divya suryavanshis body was found hanging in her residence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 06:37 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pimpri Chinchwad crime
  • Sucide News

संबंधित बातम्या

पोलीस दलात खळबळ ! कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
1

पोलीस दलात खळबळ ! कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन रोहित पाटील आक्रमक, उद्या तासगावात लाक्षणिक उपोषण; नेमकं काय आहेत मागण्या?
2

शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन रोहित पाटील आक्रमक, उद्या तासगावात लाक्षणिक उपोषण; नेमकं काय आहेत मागण्या?

चाकणमधील वाहतूक कोंडीवर कधी तोडगा निघणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

चाकणमधील वाहतूक कोंडीवर कधी तोडगा निघणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

जीव इतका स्वस्त? घरात आई बाबा असताना डॉक्टर 21 व्या मजल्यावर गेला अन्…; नेमके घडले काय?
4

जीव इतका स्वस्त? घरात आई बाबा असताना डॉक्टर 21 व्या मजल्यावर गेला अन्…; नेमके घडले काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.