Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोतया डॉक्टरने थाटलं स्वतःच क्लिनिक, चुकीची औषधी देऊन रुग्णांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

गेल्या काही दिवसांपासून एक तोतया डॉक्टर विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचार करत अनेक रुग्णांना बरे केल्याचे पासून फसवणूक करत असल्याचे समोर आले होते. परंतु काही रुग्णांच्या सावधगिरीने या तोतया डॉक्टरचे पितळ उघडे पडले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 18, 2025 | 06:37 PM
तोतया डॉक्टरने थाटलं स्वतःच क्लिनिक, चुकीची औषधी देऊन रुग्णांची फसवणूक (फोटो सौजन्य-X)

तोतया डॉक्टरने थाटलं स्वतःच क्लिनिक, चुकीची औषधी देऊन रुग्णांची फसवणूक (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

आश्वी प्रतिनिधी : ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्यांच्या भोळेपणाचा फायदा घेत अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली ग्रामीण भागामध्ये फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावात देखील असंच एक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही दिवसांपासून एक तोतया डॉक्टर विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचार करत अनेक रुग्णांना बरे केल्याचे पासून फसवणूक करत असल्याचे समोर आले होते. परंतु काही रुग्णांच्या सावधगिरीने या तोतया डॉक्टरचे पितळ उघडे पडले. या तोतया आयुर्वेदिक डॉक्टरवर आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत संबंधित होतया डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपण उपचार घेत असलेला डॉक्टर हा तोतया असून त्याकडे आयुर्वेदाचे कुठलेही पदवी तसेच वैद्यकीय बोर्डाचे प्रमाणपत्र नसल्याचे समजतात परिसरातील रुग्णांना मोठा धक्का बसला आहे.

अवैध सावकारी केल्याप्रकरणी वैध सावकारावर रबाळेत गुन्हा दाखल

प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावजाळी येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. तय्यब बाबुबाई तांबोळी व उपकेंद्रातील समुदाय अधिकारी डॉ.शहनाज शेख यांच्या सतर्कतेमुळे आश्वी बु (ता संगमनेर) येथील वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या तोतया डॉक्टरवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ नुसार अधिनियम कलम ३३ व ३६ तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत वैद्यकिय अधिकारी डॉ.तय्यब तांबोळी यांनी दिलेल्या फिर्य़ादमध्ये नमुद केली की, आश्वी बु (ता. संगमनेर) येथील संगमनेर शेतकी गट ऑफिस मध्ये नाव नसलेल्या व्हायल मधून इंजेक्सन देत असुन तेथे मोठी गर्दी झाली आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर आश्वी बु येथील उपकेंद्रातील समुदाय अधिकारी डॉ शहनाज शेख यांना सदर घटनेची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी पाठवले असता उपलब्ध माहितीनुसार आश्वी बु (ता संगमनेर) येथील संगमनेर शेतकी विभाग गट ऑफिस च्या पाठीमागील रूम मध्ये इम्रान अब्दुल खान (राहणार ८२, मंसेपुर मार्ग, रोसियाका, तहसिल कामा, रोसियाका, मुसेपुर, भरतपुर, राजस्थान) हा डॉक्टरकीची कोणती ही पदवी तसेच व्यवसाय परवाना नसताना गेल्या काही रविवार पासुन गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेवात, मणक्यातील गॅप, पॅरेलेसीस, मानेपासून ते तळ पायापर्यत नस दबणे आदी आजारावर गोळ्या औषधे न देता आयुर्वेदिक इंजेक्शनच्या नावाखाली अनधिकृतपणे उपचार करत होता. तोतया डॉक्टर हा नाव नसलेल्या व्हायलमधून इंजेक्सन देत होता.

घटनास्थळी १८ नाव नसलेल्या व्हायरल, ३ एम एल च्या प्रत्येकी २८ सीरींज तसेच डॉ. हुसेन नाव असलेले व्हिजीटिगं कार्ड सापडले. येथील कर्मचारी भरत मधुकर वर्पे (राहणार कनोली, ता.संगमनेर) याच्या सहाय्याने हा तोतया डॉक्टर वैद्यकिय व्यवसाय चालवत होता असे उघड झाले.

तोताया डॉक्टरकडे कोल्हार (ता राहाता) तसेच संगमनेर तालुक्यातील आश्वी बु, औरंगपुर, लोहारे कसारे, ओझर, मनोली आदी गावातील अनेक रूग्ण येत असत. प्रत्येक रूग्णाकडुन ११०० रूपये प्रमाणे इंजेक्शन तसेच मालीशसाठी तेल सदर तोतया डॉक्टर देत. तसेच दि १६ मार्च रोजी या तोतया डॉक्टरने जवळपास १८ रूग्णावर उपचार केले असल्याचे समजते.

इम्रान अब्दुल खान राहणार भरतपुर राजस्थान तसेच त्याला मदत करणारा भरत मधुकर वर्पे (राहणार कनोली ता.संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) यांचे विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ नुसार अधिनियम कलम ३३ व ३६ तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सोनवणे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्सेबल पी. डी. सोनवणे करत आहे.

वैद्यकिय क्षेत्रातील कुठले ही पदवी नसलेला व्यक्ती संगमनेर शेतकी विभाग गट ऑफिसमध्ये वैद्यकिय व्यवसाय कसा करू शकतो असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. यामागे कोणत्या कर्मचाऱ्याचा हात आहे तसेच बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यकीची मागे काही राजकीय वरदहस्त आहे का? या सारखे अनेक प्रश्न या प्रकरणामुळे उत्पन झाले आहे.

CM Devendra Fadnavis: नागपूर दंगलीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा गर्भित इशारा; म्हणाले, “अशा परिस्थितीत…”

Web Title: Doctor sets up his own clinic in sangamner farm office building two booked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 06:37 PM

Topics:  

  • crime
  • police
  • Sangamner

संबंधित बातम्या

Dombivali crime: डोंबिवलीत मोठी फसवणूक! बनावट सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात १०.३३ लाखांचा हार घेऊन भामटा पसार
1

Dombivali crime: डोंबिवलीत मोठी फसवणूक! बनावट सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात १०.३३ लाखांचा हार घेऊन भामटा पसार

Malegaon News: अल्पवयीन मुलगी मदत मागायला गेली आणि वासनेची शिकार झाली! MIM नेत्याला अटक; गंभीर आरोप
2

Malegaon News: अल्पवयीन मुलगी मदत मागायला गेली आणि वासनेची शिकार झाली! MIM नेत्याला अटक; गंभीर आरोप

Dhule News: मद्यधुंद अवस्थेत पोलिसांच्या गाडीला धडक, एवढेच नाही तर भर दिवसा २ पोलिसांना मारहाण केली
3

Dhule News: मद्यधुंद अवस्थेत पोलिसांच्या गाडीला धडक, एवढेच नाही तर भर दिवसा २ पोलिसांना मारहाण केली

Solapur News: तिरुपतीचा प्रसाद खाल्ला आणि झोपी गेले, सकाळी धक्कादायक दृश्य; कुटुंबातील २ चिमुरड्यांचा मृत्यू
4

Solapur News: तिरुपतीचा प्रसाद खाल्ला आणि झोपी गेले, सकाळी धक्कादायक दृश्य; कुटुंबातील २ चिमुरड्यांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.