Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivali News: इर्शाळवाडी ट्रेकदरम्यान डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; उष्णतेचा फटका की हार्ट अटॅक?

इर्शाळवाडी ट्रेकदरम्यान डोंबिवलीतील २० वर्षीय रितेश कोणका याचा अचानक मृत्यू झाला. ट्रेक करताना त्याची प्रकृती बिघडली. ग्रामस्थांनी मदत केली, मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 13, 2026 | 01:43 PM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • इर्शाळवाडी गडावर ट्रेक करताना रितेश कोणकाची प्रकृती बिघडली.
  • ग्रामस्थांनी झोळीतून डोंगरावरून खाली आणण्याचा प्रयत्न केला.
  • उष्माघात किंवा हृदयविकाराच्या झटक्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
डोंबिवली: डोंबिवली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणाचा ईशाळवाडी ट्रेक दरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मृत्यू झालेला तरुण हा आपल्या पाच मित्रांसोबत खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध इर्शाळवाडी गडावर ट्रेकिंगसाठी गेला होता. मात्र तो घरी मृत्यू झालेल्या अवस्थेत पोहोचला. या दुर्दैवी घटनेमुळे रितेशच्या मित्रपरिवारासह संपूर्ण डोंबिवली परिसरात हालहाल व्यक्त केली जात आहे.

काय घडलं नेमकं ?

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रितेश कोणका असे आहे. सोमवारी डोंबिवलीतील सहा मित्रांचा ग्रुप ट्रेकिंगच्या उद्देशाने इर्शाळवाडी येथे पोहोचला होता. यामध्ये साहिल सुर्वे, युवराज चव्हाण, मितेश गुप्ता, देवेश गुप्ता, क्रिश शेट्टी आणि रितेश कोणका यांचा समावेश होता. ट्रेक चढत असताना अचानक रितेशला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याची प्रकृती खालावली. त्याच्या मित्रांनी त्याला पाणी देऊन सावरण्याचा आणि धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच तो बेशुद्ध पडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन मित्रांनी तातडीने पायथ्याला धाव घेतली आणि स्थानिक ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावले. दुर्गम भाग असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या कष्टाने पारंपारिक झोळी तयार करून रितेशला डोंगरावरून खाली आणले, मात्र दुर्दैवाने डोंगरावरून खाली येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Madhyapradesh Crime: “जीन्स घालू नको” म्हणत सासऱ्यांनी केला विरोध, नवविवाहितेने संपवलं जीवन

उष्माघात की हृदयविकाराचा झटका?

रितेशच्या मृत्यू मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्याचा मृत्यू उष्माघात किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असावा असे बोलले जात आहे. मृत्यू मागचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यावरच समोर येईल. या घटनेने त्याच्या मित्रांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने गड-किल्ल्यांवर जाणाऱ्या पर्यटकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; धकाकदायक माहिती समोर

 कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी ७८ वर्षीय भोंदू बाबा शहिद शेख याला अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

NEET UG Exam 2026 Paper leak : १० लाखांत खरेदी अन् १५ लाखांत पेपरची विक्री; ‘नीट’ पेपर फुटीचे नाशिक कनेक्शन; एकास बेड्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: मृत तरुणाचे नाव रितेश कोणका आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गडावर घडली.

  • Que: मृत्यूमागील प्राथमिक संशय काय आहे?

    Ans: उष्माघात किंवा हृदयविकाराचा झटका हा प्राथमिक संशय आहे.

Web Title: Dombivali news tragic death of young man from dombivali during irshalwadi trek heatstroke or heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • crime
  • Dombivali
  • Dombivali Crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.