१० लाखांत खरेदी अन् १५ लाखांत पेपरची विक्री; 'नीट' पेपर फुटीचे नाशिक कनेक्शन; एकास बेड्या (फोटो सौजन्य-ChatGPT)
नाशिक : देशभरातील लाखो विद्याथ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या ‘नीट’ परीक्षा पेपर लीक प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकमध्ये पोहोचले असून, इंदिरानगर परिसरातून अटक करण्यात आलेल्या शुभम खैरणार याने चक्क प्रश्नपत्रिकेचा बाजार मांडल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, त्याने ही प्रश्नपत्रिका १० लाख रुपयांना खरेदी करून १५ लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर आली असून, या व्यवहारासाठी ‘कुरियर’ सेवेचा वापर करण्यात आला होता. राजस्थान पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या तब्बल ४२ तास आधीच प्रश्नपत्रिका संच फुटला होता. मूळ नांदगाव शहरामधील आणि सध्या इंदिरानगरमधील दिपालीनगर भागात वास्तव्यास असलेला शुभम मधुकर खखैरणार (२७) याने हा पेपर हस्तगत करण्यासाठी १० लाख रुपये मोजले होते. पेपर हाती येत्ताच त्याने तातडीने गिन्हाईक शोधून त्याच पेपरची १५ लाख रुपयांना विक्री केली. अवघ्या काही तासांत ५ लाखांची उलाढाल करणारा हा व्यवहार एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे करण्यात आला.
शुभम स्वतः बीएएमएसवा विद्यार्थी असून त्याचे वडील डॉक्टर आहेत. त्याने इंदिरानगर भागात नीट परीक्षेच्या विद्याष्यांसाठी एक ‘मार्गदर्शन केंद्र’ (काउन्सलिंग सेंटर) सुरू कैले होते. याच केंद्राच्या आडून त्याने गरजू आणि श्रीमंत विद्याथ्यांशी संपर्क साधून हे रैकेट चालवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वीरणारबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे उपायुका किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला पाचारण केले, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांचे पथक संशयिताच्या मागावर होते, त्यावेळी संशयित हा केशकर्तन करून (पूर्णत टाकल) देवदर्शनाच्या नावाखाली पलायन करण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी अवघ्या दीड तासात शिताफीने त्याला ताब्यात घेतलयावर संशयिताने गुन्द्राची कबुली दिली.
या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून १६ संशयितांना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या शुभमसह अहिल्यानगरमधील धनजय लोखडे या व्यक्तीचा शोध राजस्थान पोलीस घेत आहेत. नाशिकमधून ही प्रश्नपत्रिका हरियाणातील गुरुग्राम कनंतर जयपूर पुढे देशभर पसरवण्यात आल्याचा संशय आहे.
मार्च २०२६ मध्ये नांदगाव तालुक्यातील कोर्ट रोड भागातील मुक्ताई मेडिकलमध्ये पोलिसाना गावठी कट्टा सापडला होती. त्याप्रकरणात संशयित भावेश सखैरनार आणि देव्या उर्फ रुद्राक्ष सोनवणे यांना अटक झाली होती. भार्यशने वैष्याकडून पिस्तुल खरेदी केली होती. भावेश हा पेपरफुटी प्रकरणातील संशयित शुधनवा लहान बंधू असल्याचे कळते.
प्रश्नपत्रिका शुभमपर्यंत ‘कुरियर’च्या माध्यमातून पोहोचवण्यात आली होती. डिजिटल ट्रेकिंग टाळण्यासाठी आरोपीनी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मार्गाचा अवलंब कैला. मात्र, ही प्रश्नपत्रिका पुढे कोणाकोणाला दिली, त्यासाठी शुभम गेला होता की त्यानेही कुरियरचाच आधार घेतला, याचा तांत्रिक तपास आता राजस्थान पोलीस आणि सीबीआय करत आहे.
NEET Success Story: कुरियर बॉयच्या मुलाने सलग ५ वेळा अपयशी ठरूनही कसे मिळवले ‘नीट’मध्ये यश?






